शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

महाभूलेख पोर्टलवरील सातबारातील तांत्रिक दोष दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:18 IST

‘लोकमत’ने २४ जुलै रोजी महाभूलेख पोर्टलवरील सातबारात तांत्रिक दोष’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

- लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पीकविमा योजनेत आॅनलाईन अर्ज भरताना महाभूलेख पोर्टलवरील सातबारा अपलोड करण्यात अडचणीत येत होत्या. ‘लोकमत’ने २४ जुलै रोजी महाभूलेख पोर्टलवरील सातबारात तांत्रिक दोष’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेत प्रशासनाने २५ जुलै रोजी यातील तांत्रिक दोष दूर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.पीकविमा भरण्याची अंतीम मुदत जवळ येत असताना जिल्ह्यातील काही तलाठी सज्जातील सातबारा दस्तऐवज तांत्रिक अडचणीमुळे विमा पोर्टलवर दिसत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरणे अडचणीचे झाले होते. आपले सरकार सेवा केंद्रांसह, बँकांकडूनही जिल्हा प्रशासनाला ही माहिती देण्यात आली होती. शेतकºयांची समस्या लक्षात घेऊन लोकमतने या संदर्भात २४ जुलैच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर २५ जुलै रोजी यातील तांत्रिक दोष दूर करण्यात आला. यात वाशिम तालुक्यातील भाग ३, मालेगाव तालुक्यातील मारसूळ भाग १ व २, मेडशी भाग १ व २, शिरपूर भाग १, २ व ३, मुंगळा भाग १ व २, रिसोड तालुक्यातील रिसोड भाग २. ३ गोवर्धन भाग १ व २, व्याड भाग १ व २, मानोरा तालुक्यातील फुलउमरी भाग १ व २, गिरोली भाग १ व २, मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा भाग १ व २, तसेच कारंजा तालुक्यातील मनभा भाग १ व २ मधील गावांतील तांत्रिक दोष दूर करण्यात आले आहेत. यामुळे सर्व गावे आता पोर्टलवर दिसत असल्याने पीक विमा भरू इच्छिणाºया शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गावागावात जनजागृतीच्या सुचनामहाभूलेख पोर्टलवरील आॅनलाईन सातबारातील तांत्रिक दोष दूर केल्यानंतर संबंधित गावे पीक विमा योजनेच्या पोर्टलवर दिसत आहेत. याबाबत संबंधित गावांत दवंडी देऊन शेतकºयांत जनजागृती करण्याच्या सुचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम्. तोटावार यांनी सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना २५ जुलै रोजीच दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिम