शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

 धार्मिक सलोख्याची प्रचिती : मियॉ बाबांच्या दर्गाहमध्ये झाले ओंकारगीर महाराजांच्या पालखीचे पुजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 13:36 IST

शिरपूर जैन: प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथे ४ आॅगस्ट रोजी ओंकारगीर बाबा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काढलेली पालखी परंपरेनुसा मिर्झा मियॉ बाबांच्या दर्गात नेऊन तेथे दर्गाहच्या मुजावरांकडून पुजन करण्यात आले.

ठळक मुद्देधार्मिक सलोख्याचा प्रचिती देणारी ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अबाधित आहे. या धार्मिक विधीनंतरच भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथे ४ आॅगस्ट रोजी ओंकारगीर बाबा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काढलेली पालखी परंपरेनुसा मिर्झा मियॉ बाबांच्या दर्गात नेऊन तेथे दर्गाहच्या मुजावरांकडून पुजन करण्यात आले. धार्मिक सलोख्याचा प्रचिती देणारी ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अबाधित आहे. या धार्मिक विधीनंतरच भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला. केवळ वाशिम जिल्हाच नव्हे, तर देशभरात संतांची नगरी म्हणून शिरपूर जैनची ओळख आहे. या ठिकाणी विविध देवदेवतांसह संत महात्म्यांची मंदिरे आहेत. येथील जैन मंदीर जगप्रसिद्ध असल्याने जैनांची काशी म्हणूनही शिरपूर ओळखले जाते. या ठिकाणी संत जानगीर महाराज आणि मिर्झा मियॉ यांच्या समाधी आहेत. हे दोघे समकालीन मित्र होते. त्यांच्या स्मृतीसह विविध उत्सवानिमित्त पालखी आणि उर्सचे आयोजन होते जानगीर महाराजांची पालखी शेकडो वर्षांपासून मिर्झा मियॉ दर्गाहमध्ये नेण्यात येते, तर मिर्झा मियॉ बाबांच्या उर्सनिमित्त काढलेली संदल मिरवणूक ही जानगीर महाराज संस्थानमध्ये नेण्यात येते. त्याशिवाय गेल्या २२ वर्षांपासून जानगीर महाराजांचे शिष्य संत ओंकारगीर महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याची पालखीही मिझॉ मियॉ बाबांच्या दर्गाहमध्ये नेऊन तिचे मुजावरांच्या हस्ते पुजन करण्यात येथे. नैवैद्य चढविला जातो. हिंदू भाविक तेथे धार्मिक विधी साजरे करतात, तर मुस्लीम बांधवही मनोभावे पालखीपुढे माथा टेकवितात. यंदाही संत ओंकारगीर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त काढलेली पालखी मिर्झा मियॉ बाबांच्या दर्गाहवर नेण्यात आली आणि परंपरेनुसार मुजावरांच्या हस्ते पालखीचे पुजन करण्यात आले. जानगीर महाराज संस्थानच्या विश्वस्तांकडून मिर्झा मियॉ बाबांच्या दर्गाहमधील मुजावरांचा पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर जानगीर महाराज संस्थानवर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन