शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 17:50 IST

सन २००१ ते २००९ या कालावधीतील कर्ज थकीत असलेल्या मात्र सन २००८ व २००९ मधील कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकरी खातेदारांनाही योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देइमूपालन, शेडनेट, पॉलिहाऊससाठी २००१ ते २०१६ या कालावधीत घेतलेल्या तथा थकीत कर्जाचा समावेशही या योजनेत करण्यात आला आहे. ५ जूनपर्यंत आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

वाशिम : राज्यशासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून आता सन २००१ ते २००९ या कालावधीतील कर्ज थकीत असलेल्या मात्र सन २००८ व २००९ मधील कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकरी खातेदारांनाही योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच इमूपालन, शेडनेट, पॉलिहाऊससाठी २००१ ते २०१६ या कालावधीत घेतलेल्या तथा थकीत कर्जाचा समावेशही या योजनेत करण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ५ जूनपर्यंत आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.कर्जमाफी योजनेत १  एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ पर्यंत उचल केलेल्या पीक कर्ज किंवा मध्यम मुदत कर्जाची ३० जून २०१६ रोजी थकीत रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंत पीक कर्ज, पुनर्गठन केलेले व मध्यम मुदतीचे मुद्दल व व्याजासह एकूण दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत इमूपालन, शेडनेट, पॉलिहाऊससाठी मध्यम मुदतीचे कर्ज घेतलेल्या आणि अशा कर्जापैकी ३० जून २०१६ रोजी थकीत झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंतची मुद्दल व व्याजाची थकीत रक्कम दीड लाखाच्या मर्यादेत माफ होणार आहे. या थकबाकीदार शेतकºयांचे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या पूर्वीच्या निकषानुसार सरसकट कर्जमाफी देण्यात येणार आहे. परंतु, याकरिता ५ जून २०१८ पूर्वी आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रमेश कटके यांनी कळविले आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी