शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड तालुक्यातील पुनर्वसित बिबखेडा गावात अद्याप कुठल्याच मुलभूत सोयी-सुविधा नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 17:55 IST

रिसोड : तालुक्यातील बिबखेडा या पुनर्वसित गावात अद्याप कुठल्याच मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून लघुपाटबंधारे विभागाने याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे.सन २००६-०७ मध्ये लघुपाटबंधारे विभागाकडून पळसखेड सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पामुळे बिबखेडा हे गांव पूर्णत: बुडित क्षेत्राखाली गेले असून ...

ठळक मुद्देपळसखेड सिंचन प्रकल्पामुळे बिबखेडा हे गांव पूर्णत: बुडित क्षेत्राखाली गेले असून गावातील २४८ कुटूंब यामुळे बाधीत झाली आहेत.सिंचन प्रकल्प उभा होवून आजमितीस ११ वर्षाचा मोठा कालावधी उलटला तरी देखील अंतर्गत रस्त्यांची कामे, विद्यूतीकरण व पोचरस्त्यांची कामे रखडली आहेत. प्लॉटचे नंबर न मिळाल्याने कोणता प्लॉट कुणाचा, हे कळायला मार्ग राहिला नाही.

रिसोड : तालुक्यातील बिबखेडा या पुनर्वसित गावात अद्याप कुठल्याच मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून लघुपाटबंधारे विभागाने याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे.सन २००६-०७ मध्ये लघुपाटबंधारे विभागाकडून पळसखेड सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पामुळे बिबखेडा हे गांव पूर्णत: बुडित क्षेत्राखाली गेले असून गावातील २४८ कुटूंब यामुळे बाधीत झाली आहेत. तथपि, सिंचन प्रकल्प उभा होवून आजमितीस ११ वर्षाचा मोठा कालावधी उलटला तरी देखील अंतर्गत रस्त्यांची कामे, विद्यूतीकरण व पोचरस्त्यांची कामे रखडली आहेत. गावात शासनाकडून मिळालेल्या जागेवर धरणग्रस्तांनी पक्की घरे बांधली आहेत. या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जलकुंभ बांधण्यात आला; परंतु त्यात कधीच पाणी राहत नाही. गावात काहीठिकाणी रस्ते उभारण्यात आले. मात्र, सांडपाणी वाहून नेण्यासाठी त्यात कुठलीच ठोस व्यवस्था करण्यात आलेली नाही. गावातील लहान मुलांसाठी अंगणवाडीची इमारत नाही. त्यामुळे ती एका सामाजिक सभागृहात भरवावी लागत आहे. प्रशासनाने गावात स्मशानभुमी दिली; पण ती एका शेतकºयाच्या शेतात बांधण्यात आली असून ती जागा देखील धरणासाठी संपादित करण्यात आलेली आहे. त्यामुळे गावात कुणाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार नेमके कुठे करावे, हा प्रश्न गावकºयांना भेडसावत आहे. गावातील नागरिकांना शासकीय जागेवर घर बांधण्यासाठी प्लॉट देण्यात आले. मात्र, प्लॉटचे नंबर न मिळाल्याने कोणता प्लॉट कुणाचा, हे कळायला मार्ग राहिला नाही. एकूणच या सर्व समस्यांमुळे बिबखेडा येथील धरणग्रस्त नागरिक पुरते वैतागले आहेत.

प्रशासकीय इमारती हस्तांतरणाचा प्रश्न रखडला!पुनर्वसीत बिबखेडा येथे नव्याने ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा आणि सामाजिक सभागृहाची इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, जोपर्यंत अपेक्षित सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत या इमारती ताब्यात घेतल्या जाणार नाहीत, अशी भूमिका बिबखेडा ग्रामपंचायतीने घेतली आहे. 

बिबखेडा या गावातील ३५० घरांचे पुनर्वसन करण्यात आले असून या घरांना बहुतांश सुविधा देण्यात आल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांना नियमानुसार प्लॉट वाटप करून इसारपट करून देण्याची कार्यवाही देखील पूर्ण झाली आहे. उर्वरित सुविधा ग्रामपंचायतीने प्रशासकीय इमारती ताब्यात घेतल्यानंतर पुरविल्या जातील. - शिवाजी जाधव, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिम