शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तालुकास्तरावर होणार शेतकऱ्यांच्या पिकविमा तक्रारींचे निवारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:57 IST

कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी परिपत्रक काढून तालुकास्तरावर पिकविमा तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : पिकविम्याच्या प्रश्नावर २१ जून रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांनी विधीमंडळामध्ये उंबरठा उत्पन्न, जोखीमस्तर, तालुकास्तरावर तक्रार निवारण समिती यासोबतच निकषात बदल करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी परिपत्रक काढून तालुकास्तरावर पिकविमा तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सहाही तालुक्यांमध्ये समित्यांचे गठण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार पाटणी यांनी १४ जुलै रोजी दिली.पिकविमा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष त्या-त्या तालुक्यांचे तहसीलदार राहतील; तर तालुका कृषी अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. याशिवाय या समितीमध्ये गटविकास अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, दोन शेतकरी, अग्रणी बँकेचे तालुकास्तरीय प्रतिनिधी, विमा कंपनीचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्राचे दोन प्रतिनिधी आदिंचा समावेश करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तक्रारींची देखील दखल घेतली जाणार असल्याचे आमदार पाटणी यांनी सांगितले.तथापि, ज्या शेतकऱ्यांच्या पिकविमासंदर्भात तक्रारी असतील, अशा शेतकºयांनी पिकविमा तक्रार निवारण समितीकडे तक्रारी दाखल कराव्या, असे आवाहन आमदार पाटणी यांनी केले. विधीमंडळामध्ये उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी उंबरठा उत्पन्न काढताना जोखीमस्तर ७० टक्यांवरून ९० टक्के तसेच ‘बेस्ट आॅफ फाईव्ह’ याऐवजी ‘बेस्ट आॅफ सेवन’ यानुसार सात वर्षांपैकी ज्यावर्षी सगळ्यात जास्त उत्पन्न असेल ते ग्राह्य धरावे, ही मागणी देखील केंद्र शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाCrop Insuranceपीक विमा