शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक शौचालयांचे लक्ष्य असलेल्या ९४ ग्रामपंचायतींना रेड अलर्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 19:03 IST

वाशिम: जिल्हा हगणदरीमुक्त होण्यास अडसर ठरणा‍ºया २४७ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जि. प. अध्यक्ष  हर्षदा देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी पत्र पाठवून शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्दे जिल्हयामध्ये एकुण २४४ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाला असून जिल्ह्यातील वैयक्तीक शौचालयांची संख्या ७६ टक्के इतकी झालेली आहेत. बाकी राहिलेल्या कामाचे दररोजचे, हप्त्याचे व महिन्याचे नियोजन करण्याच्या सुचना ग्रामपंचायतींना पाठविलेल्या पत्राव्दारे देण्यात आल्या आहेत. 

वाशिम: जिल्हा हगणदरीमुक्त होण्यास अडसर ठरणा‍ºया २४७ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जि. प. अध्यक्ष  हर्षदा देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी पत्र पाठवून शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. २०० पेक्षा अधिक शोचालय बांधकामांचे उद्दीष्ट बाकी असलेल्या ९४ सरपंचांना लाल सहिचे पत्र पाठवून कलम ३९ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सन २००० पासून जिल्ह्यातील प्रत्येक घरामध्ये शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा वापर करण्याचा कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. ९ आॅगस्ट २०१५ पासून संपूर्ण स्वच्छतेची आॅगस्ट क्रांती हे अभियान सुरु करुन कार्यक्रमास गती देण्यात आली. गेल्या दोन वर्षामध्ये जिल्ह्यात जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. त्यात महीला मेळावे, गृहभेटी, रॅली, एलईडी व्हॅन, याव्दारे तसेच कलावंतांमार्फत जनजागरण प्रभात फेºयांमुळे वैयक्तीक शौचालय बांधकामाची व वापराची आवश्यकता याचे महत्व जनतेला पटवुन देण्यात आलेले आहे. परिणामी, जिल्हयामध्ये एकुण २४४ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाला असून जिल्ह्यातील वैयक्तीक शौचालयांची संख्या ७६ टक्के इतकी झालेली आहे. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष योगदान दिल्यामुळे जिल्हा हगणदरीमुक्तीकडे  वाटचाल करीत आहे.असे असताना २४७ ग्रा. पं. मध्ये या दोन वर्षात शौचालय कामाची प्रगती मंदावली असून यास गती मिळण्याकरिता सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षांनी गृहभेटी देवून ग्रामस्थांना प्रेरीत करण्याचे आवाहन करण्यात आले. बाकी राहिलेल्या कामाचे दररोजचे, हप्त्याचे व महिन्याचे नियोजन करण्याच्या सुचना ग्रामपंचायतींना पाठविलेल्या पत्राव्दारे देण्यात आल्या आहेत. 

...तर सरपंचांवर कलम ३९ अंतर्गत कारवाई!विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गाव हगणदरीमुक्त करुन दिलेल्या उद्दिष्टानुसार काम न करणाºया ग्रामपंचायतींवर कलम ३९ अन्वये कारवाई करण्याचा सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात या कार्यक्रमामध्ये सहभागी होवुन वैधानिक जबाबदारी पार पाडण्यात कसुर करणाºया ग्रामपंचायतींवर कलम ३९ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कळविले आहे.

टॅग्स :washimवाशिम