शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता

By दिनेश पठाडे | Updated: July 15, 2023 15:30 IST

राज्यातील ९ जिल्ह्यांत १०० विद्यार्थी क्षमतेची नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांना संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याची घोषणा राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी केली होती.

वाशिम : जिल्ह्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास २८ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली होती. त्यानुषंगाने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाने १४ जुलैला शासन निर्णय जारी केला असून वाशिमात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यांस संलग्न ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.  

राज्यातील ९ जिल्ह्यांत १०० विद्यार्थी क्षमतेची नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांना संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याची घोषणा राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने नवी वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांना संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याबाबतचा जागेचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या सचिवांकडे सादर केला होता. वाशिम जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील  ३०.९१ हे. आर. (७७.०० एकर) ई-क्लास जमिन प्रस्तावित करण्यात आली. २८ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळाली. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाताच वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढील कार्यवाहीला वेग दिला. त्यानुसार तात्पुरत्या स्वरुपात जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी पदे निर्मिती आणि निधीची तरतूद करण्यात आली आहे.महाविद्यालयाकरिता ४४८ पदे

वाशिम येथील नवीन वैद्यकीय महाविद्यायांकरिता विविध संवर्गातील एकूण ४४८ पदे निर्माण करण्यास मान्यता मिळाली आहे. वर्ग- १ ची ४८, वर्ग-दोन ४४, विद्यावेतनाची पदे ५९, वर्ग-३ (नियमित पदे) ९३, काल्पनिक पदे वर्ग-३ (बाह्यस्त्रोताने)१३९ आणि वर्ग-४ (कंत्राटी) ६५ असे पदे असणार आहेत.४३० खाटांच्या रुग्णालयाकरिता आवश्यक पदे ९८६

वाशिम जिल्ह्यात स्थापन होणाऱ्या ४३० खाटांच्या  नवीन रुग्णालयांकरिता ९८६ पदे निर्माण करण्यास मान्यता मिळाली आहे. यामध्ये वर्ग-१ ची ३, वर्ग-२ ची १४, वर्ग- ३ (नियमित पदे) ५०३, वर्ग-३ (काल्पनिक पदे) ३७, वर्ग-४ (कंत्राटी) ४२९

टॅग्स :washimवाशिम