शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

केवळ एक वर्षाचा निधी मिळाला; तीन वर्षातील अनुदानाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:40 IST

Washim News निधीच नसल्याने २०२०-२१ मध्ये एकाही घरकुलाचे बांधकामही सुरू होऊ शकले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागातील रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१६-१७ मधील जिल्ह्यातील घरकुल लाभार्थींचे प्रलंबित अनुदान आठ दिवसांपूर्वी शासनाने अदा केले; परंतू सन २०१७ ते २०२० या तीन वर्षातील प्रलंबित अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे. दुसरीकडे निधीच नसल्याने २०२०-२१ मध्ये एकाही घरकुलाचे बांधकामही सुरू होऊ शकले नाही.राहायला निवारा नसलेले, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थींना रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. सन २०१६-१७ ते २०१९-२० या वर्षात जिल्ह्यात हजारो घरकुले मंजूर होऊन लाभार्थींनी बांधकामदेखील केले. सन २०१६-१७ या वर्षात ११६४ पैकी १०४८ घरकुल लाभार्थींना अनुदान मिळाले तर ११६ लाभार्थींना अनुदान मिळाले नव्हते. याप्रमाणेच सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० मध्ये घरकुल बांधकाम करणाऱ्या जवळपास तीन हजारावर लाभार्थींना अनुदान मिळाले नाही. राज्य शासनाने आठ दिवसांपूर्वी सन २०१६-१७ मधील प्रलंबित अनुदान देण्यासाठी जवळपास एक कोटींचा निधी मंजूर केला. परंतू, सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षातील प्रलंबित अनुदानासंदर्भात अद्याप निधीची तरतूद नसल्याने घरकुल लाभार्थींमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.दुसºया व तिसºया टप्प्यातील अनुदान न मिळाल्याने एक हजारावर लाभार्थींच्या घरकुलांचे बांधकाम अर्धवट राहिले आहे.रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१६-१७ या वर्षातील घरकुलांचे प्रलंबित अनुदान शासनस्तरावरूनच लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. उर्वरीत तीन वर्षातील अनुदान मंजूर झाल्यानंतर संबंधित लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.-डॉ. व्ही.एन. वानखेडेप्रभारी संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना