शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाच्या शिधाचे २.४७ लाख पाॅकिट मिळाले!

By संतोष वानखडे | Updated: September 17, 2023 14:54 IST

१०० रुपयांत चार वस्तू: उत्सवाचा गोडवा वाढणार.

संतोष वानखडे, वाशिम : गतवर्षी दिवाळी आणि पाडव्यानिमित्त आनंदाचा शिधा वितरीत केल्यानंतर यंदा गौरी-गणपती उत्सवातही १०० रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा’ पात्र लाभार्थींना दिला जात आहे. जिल्ह्याला शिधा जिन्नसचे २.४७ लाख पाॅकिट मिळाले असून, गौरी-गणपतीच्या उत्सवात गोडवा आणखी वाढणार आहे.

शासनाच्या घोषणेनुसार १०० रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल याप्रमाणे हा शिधा संच असणार आहे. गतवर्षी राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. अगदी गुढीपाडव्यापर्यंत आनंदाचा शिधा पोहचला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. यंदा मात्र गतवर्षीची पुनरावृत्ती होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आल्याचे दिसून येते. जिल्ह्यात ७७६ रेशन दुकाने आहेत. शिधा जिन्नसचे २.४७ लाख पाॅकिट मिळाले असून, गावपातळीवर त्याचे वितरणही सुरू करण्यात आले आहे. कोणाला मिळणार आनंदाचा शिधा?

अंत्योदय, अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, तसेच दारिद्र्यरेषेखालील (एपीएल) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा योजनेचा लाभ मिळणार आहे. ई-पॉसप्रणालीद्वारे आनंदाचा शिधा वितरित करण्यात येत आहे.

जिल्ह्याला मागणीनुसार आनंदाचा शिधा प्राप्त झालेला आहे. शासनाच्या घोषणेनुसार आगामी गौरी-गणपती उत्सवानिमित्त जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आनंदाचा शिधा वितरीत करण्यात येत आहे. पात्र लाभार्थींनी संबंधित रेशन दुकानात जावून १०० रुपयांत आनंदाचा शिधा घ्यावा. - राजेश वजिरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम