शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

पोषण अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी सज्ज राहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 14:46 IST

पोषण अभियानांतर्गत महिनाभर राबवावयाच्या कार्यक्रम, उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - जिल्ह्यामध्ये १ ते३० सप्टेंबरपर्यंत महिनाभर पोषण अभियान राबविण्यात येत असून या अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी सज्ज राहा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी विभाग प्रमुखांसह गटविकास अधिकाºयांना दिल्या.पोषण अभियानांतर्गत महिनाभर राबवावयाच्या कार्यक्रम, उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष ग्रामसभा, माहिती व प्रसिद्धी साहित्य वाटप, प्रभात फेरी, पोषण या विषयावर शाळेत चित्रपट दाखवणे, ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे वजन घेऊन छाननी करणे, ग्राम स्तरावर मुला-मुलींच्या जन्मदराचे फलक लावणे, बेटी बचाओ बेटी पढाओ, कृती आराखडा तयार करणे, मासिक पाळी व्यवस्थापन, ग्राम आरोग्य स्वच्छता व पोषण दिवस साजरा करणे, शाळा व अंगणवाडी केंद्रातील शौचालयासाठी पाणी सुविधा उपलब्ध करणे, अस्मिता योजने अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करणे, जिल्हास्तरावर पोषण मेळावे, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, पथनाट्य, शालेय निबंध स्पर्धा, प्रभात फेरी आदी आठवडानिहाय कार्यक्रमांची रुपरेषा मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी स्पष्ट केली. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार हा उपक्रम होत आहे. ग्रामविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून सदर अभियान राबविण्यात येत आहे. अभियानासाठी आठवडानिहाय कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. याबाबतचे सादरीकरण महिला बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहूर्ले यांनी केले. या विविध उपक्रम आणि कार्यक्रमातून बालकांचे चांगले पोषण व्हावे या दृष्टीने मार्गदर्शन तसेच जनजागरण करावे, अशा सूचना मीना यांनी दिल्या. सर्व विभाग प्रमुखांसह गट विकास अधिकाºयांनी या मोहिमेत स्वत: पुढाकार घेऊन आपल्या अधिनस्त सर्व कर्मचाºयांमार्फत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले. तालुका व ग्रामस्तरावर होणाºया विविध कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग घेण्याबाबतदेखील मीना यांनी सूचना दिल्या.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद