शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

तर्‍हाळा येथे भायजी महाराज यात्रा महोत्सवनिमित्त झाले रावण, कुंभकर्णाचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 17:33 IST

शेलूबाजार ( वाशिम ) : नजीकच्या तर्‍हाळा येथील संत भायजी महाराज यांच्या भरत भेट यात्रेनिमित्त  २३ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजताचे दरम्यान विधिवत पूजा करुन रावण, कुंभकर्णाचे दहन शेकडो नागरिकांच्या उपस्थित पार पडले .

लोकमत न्यूज नेटवर्क

शेलूबाजार ( वाशिम ) : नजीकच्या तर्‍हाळा येथील संत भायजी महाराज यांच्या भरत भेट यात्रेनिमित्त  २३ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजताचे दरम्यान विधिवत पूजा करुन रावण, कुंभकर्णाचे दहन शेकडो नागरिकांच्या उपस्थित पार पडले .  हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील भक्तगण पहाटे ४ वाजेपासून तर्‍हाळा येथे दाखल झाले होते.     तर्‍हाळा येथील संत भायजी महाराज संस्थानच्यावतीने भरत भेट यात्रा महोत्सवनिमित्त मागील कित्येक वर्षापासूनची परंपरा जपत हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यासाठी गावकरी जोमाने सप्ताहाभर अहोरात्र मेहनत घेतली . सप्ताहाभर विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रावण कुंभकर्णाचे पुतळे तयार करण्यासाठी वृध्द मंडळी मागील ८ ते १५ दिवसापासून कामाला लागले होते . त्यांना लहान लहान बालकांनी हातभार लावला दि २२ डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला . २३ डिसेंबर  रोजी मध्यरात्री पासून रावण, कुंभकर्ण दहन कार्यक्रमाची तयारी सुरु करण्यात आली. पहाटे ५ वाजेपासून विधीवत पूजेचा कार्यक्रम सुरु करण्यात आले . या सोहळ्यात कडाक्याची थंडी असतांनाही महिलांची लक्षणीय उपस्थीती होती. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या वेशभूषातील बालकांनी लोकांची मने जिंकली .सकाळी ५ . ४० वाजता राम, लक्ष्मण यांनी रावण व कुंभकर्णाचे वध केल्यावर हनुमानाचे हस्ते दहन करण्यात आले . त्यानंतर राम लक्ष्मण यांची भरत व शत्रुघ्न यांची भेट झाली . या भेटी नंतर आरतीचा कार्यक्रम पार पडला .

टॅग्स :washimवाशिमIndian Traditionsभारतीय परंपरा