शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी शाळांच्या कंत्राटीकरणाविरोधात वाशिमात रास्तारोको !

By संतोष वानखडे | Updated: September 26, 2023 15:17 IST

समनक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड, राष्ट्रीय नेते डॉ. अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी जिल्हा व तालुकास्तरावर एकाच वेळी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती. 

वाशिम : राज्यातील सर्व सरकारी शाळांच्या कंत्राटीकरणाचा तसेच सरकारी नोकरभरती खाजगी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी समनक जनता पार्टी व शाळा बचाव समितीच्या वतीने २६ सप्टेंबर रोजी दुपारी १:३०  वाजताच्या सुमारास वसंतराव नाईक चौक, वाशीम येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

समनक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड, राष्ट्रीय नेते डॉ. अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी जिल्हा व तालुकास्तरावर एकाच वेळी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती.  वाशीम येथे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व सरकारी शाळा कंत्राटी पद्धतीने उद्योगपतींना चालविण्यास देणार असल्याचा शासन निर्णय नुकताच शासनाने काढला आहे.

तसेच सरकारी नोकर भरती ही खाजगी संस्थांच्या  माध्यमातून करण्याबाबतचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे. हे दोन्हीही निर्णय पुरोगामी महाराष्ट्राला खाईत लोटणारे आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.  दोन्ही निर्णय तात्काळ रद्द करावेत आणि पूर्वीप्रमाणेच सरकारी नोकरभरती करावी, शिक्षणाचे राष्ट्रीयिकरण करावे.

तसेच यूपीएससी परीक्षा न घेता हुकूमशाही पद्धतीने केलेल्या आयएएस दर्जाच्या नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात, आमदार आणि खासदारांची पेन्शन रद्द करून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू कराववी,  शेतकऱ्यांना पेन्शन लागू करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन भर पावसात करण्यात आले. काही वेळ या महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. 

टॅग्स :washimवाशिम