शिरपूर जैन (जि. वाशिम): शेतात रखवालीसाठी असलेल्या ३0 वर्षीय महिलेवर शेतमालकाने बलात्कार केल्याची घटना २२ मे च्या रात्रीदरम्यान कोयाळी जाधव येथे घडली. या प्रकरणी २४ मे रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोयाळी जाधव येथील राजू बाजड याच्या शेतात उन्हाळी मूग पिकाच्या रखवालीसाठी पीडित महिला आपल्या पती व मुलासह तीन महिन्यांपासून राहत होती. सदर महिलेने शेतमालक राजू बाजड यास मजुरीचे पैसे मागितले. शेतमालकाने पैसे देण्यास नकार दिला तसेच २२ मे च्या रात्रीदरम्यान महिलेचा पती घरी नसल्याचे पाहून सदर महिलेवर बलात्कार केला, अशा तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेवर बलात्कार; आरोपीविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: May 25, 2015 02:50 IST