शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मोलमजुरी करुन गाठले ‘राजश्री’ने उद्दिष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 16:43 IST

कुटुंबात कोणीही उच्चशिक्षीत नसताना, घरची हलाकीची परिस्थितीतही मोलमजुरी करुन एमपीएससी परिक्षेत राज्यात एसटी मुलीमधून तिसºया क्रमांकावर येवून करसंग्राहक म्हणून वर्णी लावली.

- नंदलाल पवार मंगरुळपीर  :    मनुष्याच्या अंगी जिद्द , चिकाटी असल्यास त्याला कितीही अडचणी आल्यास , तसे वातावरणही नसले तरी तो आपले उद्दिष्ट गाठल्याशिवाय राहत नाही. असाच काहीसा प्रकार मंगरुळपीर तालुकयातील एका छोटयाश्या तीन हजार लोकवस्ती असलेल्या कोठारी गावातील राजश्री धोंगडे नामक मुलीने करुन दाखविला. कुटुंबात कोणीही उच्चशिक्षीत नसताना, घरची हलाकीची परिस्थितीतही मोलमजुरी करुन एमपीएससी परिक्षेत राज्यात एसटी मुलीमधून तिसºया क्रमांकावर येवून करसंग्राहक म्हणून वर्णी लावली. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतू होत आहे. राजश्रीचे  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातील महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय कोठारी येथे झाले . १२ वीचे शिक्षण गावापासून ५ किमी दूर असलेल्या जनता विद्यालय कवठळ येथे तीने पुर्ण केले.  पुढील शिक्षणासाठी खर्च करण्याची तयारी नसतांना मोलमजुरी केली.  कारण वडिलांकडे जेमतेम ३ एकर शेती त्यात घरात ४,५ भावंड . घरची आर्थीक परिस्थीती अत्यंत बिकट असतांना तीने  मुक्त विद्यापिठातून पदवीपर्यंत शिक्षण घेतले.  नंतर कुठल्याही मोठया शहरात स्पर्धा परिक्षेचा क्लास न लावता शेतात काम करून ती घरीच स्पर्धा परिक्षेची तयारी करू लागली . जिद्द चिकाटी व परिश्रम करण्याची तिची वृत्ती असल्याने पहिल्याच स्पर्धा परिक्षेत तिने यश संपादन करून पोस्ट खात्यात लिपीक पदावर निवड झाली , ऐवढयावरच समाधान  न मानता पुन्हा तीने स्पर्धा परिक्षा दिल्या त्यात तिला यश मिळाले.  मुंबई येथे मंत्रालयात कनिष्ठ लिपीक पदावर तीची निवड झाली तरीही  तीने पुन्हा स्पर्धा परिक्षा दिली . २०१९ च्या महाराष्टÑ लोकसेवा आयोग एमपीएससी परिक्षेत तीने एसटी मुलीमधून राज्यात तिसºया क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला व कर सहाय्यक पदावर तिची निवड झाली. राजश्रीच्या कुटुंबात कोणीही उच्चशिक्षित नाहीकुटूंबात कोणालाही उच्च शिक्षणचा गंध नाही.  वडीलाचे शिक्षण ४ थी पर्यंत तर आई अशिक्षीत .  शेतीतून मिळणाºया तुटपुंज्या उत्पन्नावर तर कधी मोलमजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करत जिद्द व चिकाटीने राजश्रीने यश संपादन केले. घरी  जेमतेम ३ एकर शेती. तीन बहीणी २ भाउ  अशा अत्यंत बिकट परिस्थीतीतून तिने यश संपादन केले. घरात कोणीही उच्चशिक्षीत नाही. तरी सुध्दा शिक्षणाची आवड निर्माण करुन राजश्रीने आपले भवितव्य घडविले. जिवनात उदिष्ट ठेवल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे राजश्रीचे मत आहे.- राजश्रीच्या यशाचे कौतूक व सत्कार  महाराष्टÑ लोकसेवा आयोग एमपीएससी परिक्षेत एसटी मुलीमधून राज्यात तिसººया क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवत  कर सहाय्यक पदावरनिवड होणाºया राजश्रीचे यशाचे कौतुक गावातील सर्व स्तरातून होत आहे.  महात्मा  ज्योतीबा फुले विद्यालय कोठारी च्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी तीचा सत्कार केला. राज्यात नावलौकीक केल्याबद्दल तीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरMPSC examएमपीएससी परीक्षा