शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाच्या उभारणीसाठी केलेल्या पर्यायी रस्त्याची पावसात दुदर्शा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 14:52 IST

शिरपूर: मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर येथे उभारण्यात येत असलेल्या मिर्झापूर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात मिर्झापूर-घाटा हा रस्ता गेल्याने ग्रामस्थांच्या सोयीसाठी पर्यायी रस्त्याची उभारणी करण्यात आली; परंतु या रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने पहिल्याच पावसात हा रस्ता चिखलमय झाला, तर पूर्वीचा रस्ता पाण्यात गेला आहे.

ठळक मुद्देलघू पाटबंधारे विभागाच्यावतीने प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या उभारणीमुळे मिर्झापूर-घाटा हा रस्ता बुडित क्षेत्रात गेला आहे. पावसाने उसंत घेतली तरी, रस्ता पूर्ण चिखलमय झाला असल्याने या दोन्ही गावांतील लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शिरपूर: मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर येथे उभारण्यात येत असलेल्या मिर्झापूर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात मिर्झापूर-घाटा हा रस्ता गेल्याने ग्रामस्थांच्या सोयीसाठी पर्यायी रस्त्याची उभारणी करण्यात आली; परंतु या रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने पहिल्याच पावसात हा रस्ता चिखलमय झाला, तर पूर्वीचा रस्ता पाण्यात गेला आहे. त्यामुळे मिर्झापूर-घाटा येथील ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मिर्झापूर परिसरात सिंचनक्षेत्रात वाढ करण्यासह पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी लघू पाटबंधारे विभागाच्यावतीने प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे ६५० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीमुळे मिर्झापूर-घाटा हा रस्ता बुडित क्षेत्रात गेला आहे. त्यामुळे शेतकºयांसह ग्रामस्थांच्या वहिवाटीचा प्रश्न उपस्थित होत असल्याने ग्रामस्थांनी पर्यायी रस्त्यासाठी या प्रकल्पाचे कामही बंद पाडले होते. अखेर प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळून पर्यायी रस्त्यालाही मंजुरी देण्यात आली. त्यानंतर या प्रकल्पाचे काम वेगाने करण्यात आले आणि पर्यायी रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले; परंतु या रस्त्याचे काम करताना दबाई व्यवस्थीत झाली नाही, तसेच डांबरीकरणाचे कामही पूर्ण झाले नसतानाच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मिर्झापूर प्रकल्पात जलसंचय झाला आणि मिर्झापूर आणि घाटावासियांसाठी केलेल्या या नव्या रस्त्यावरून पाणी वाहले. परिणामी हा रस्ता चिखलमय झाला असून, या रस्त्यावर वाहने फसत आहेत. त्यातच पूर्वीचा रस्ता पाण्यात बुडला असल्याने ग्रामस्थांना वहिवाटीत अडचणी येत आहेत. आता पावसाने उसंत घेतली तरी, रस्ता पूर्ण चिखलमय झाला असल्याने या दोन्ही गावांतील लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन या रस्त्याचे काम त्वरीत करावे,  अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमroad transportरस्ते वाहतूकShirpur Jainशिरपूर जैन