शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

वाशिम जिल्हयात पावसामुळे पिकांना संजिवनी, तूट कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 14:12 IST

वाशिम : गत १५ ते २० दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस २५ जुलै व २६ जुलै रोजी कमी-अधिक प्रमाणात जिल्हयात सर्वदूर बरसल्यामुळे पिकांना संजिवनी मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत १५ ते २० दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस २५ जुलै व २६ जुलै रोजी कमी-अधिक प्रमाणात जिल्हयात सर्वदूर बरसल्यामुळे पिकांना संजिवनी मिळाली आहे. दुसरीकडे १ जून ते २५ जुलैपर्यंत अपेक्षित सरासरी ३७२ मीमी असताना प्रत्यक्षात १९५ मीमी पर्जन्यमान झाल्याने तूट कायम आहे. येत्या दोन दिवसात विदर्भात चांगला पाऊस येण्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.गतवर्षीदेखील पावसाळ्यात नियमित पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नव्हते. गतवर्षीची कसर यावेळी भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन केले होते. परंतू, यावर्षी मान्सून लांबल्याने मूग, उडदाची पेरणी होऊ शकली नाही. सोयाबीन, तूर व अन्य वाणांची पेरणी झाल्यानंतर १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारली. परिणामी, पिके संकटात सापडली होती. २५ जुलै रोजी दुपारनंतर जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना संजिवणी मिळाली. २६ जुलै रोजीदेखील जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिमझिम असल्याने पिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, दमदार पाऊस नसल्याने पावसाची तूट कायम आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो. १ जून ते २५ जुलै या कालावधीत ही सरासरी ३७६.०६ मिलीमिटर अपेक्षीत असते. मान्सूनचे विलंबाने आगमन, त्यानंतरही पावसात सातत्य नसणे आणि दमदार पाऊस नसणे यामुळे १ जून ते २५ जुलै या कालावधीत प्रत्यक्षात अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. १ जून ते २५ जुलै या कालावधीत पर्जन्यमापकाद्वारे घेतलेले सरासरी पर्जन्यमान १९५.०७ मीमी असून, याची टक्केवारी ५२.४३ अशी आहे. अपेक्षित सरासरीपेक्षा ४८ टक्के कमी पर्जन्यमान झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. १ जून ते २५ जुलै या दरम्यान वाशिम तालुक्यात एकूण २३७.४४ मीमी, मालेगाव २०२.३९ मीमी, रिसोड २२९.६४, मंगरूळपीर १९७.७१ मीमी, मानोरा १५४.९५ मीमी आणि कारंजा तालुक्यात एकूण १४८.३३ मीमी पर्जन्यमान झाले. २५ जुलै ते २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १३.९४ मीमी पाऊस झाला. २६ जुलै रोजीदेखील जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. विदर्भात २८ जुलैपर्यंत चांगला पाऊस येण्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. पर्जन्यमानाच्या नोंदीत तफावतजिल्ह्यात पर्जन्यमापकाद्वारे तसेच महावेध वेबसाईटवरून पर्जन्यमानाची नोंद घेतली जाते. या दोन्ही नोंदीत प्रचंड तफावत असल्याने नेमकी आकडेवारी कोणती ग्राह्य धरावी, याबाबत संभ्रमावस्था आहे. पर्जन्यमापकाद्वारे घेतलेल्या आकडेवारीनुसार १ जून ते २५ जुलै या कालावधीत सरासरी १९५.०८ मीमी पर्जन्यमान झाले तर महावेध वेबसाईटवरून घेतलेल्या आकडेवारीनुसार सरासरी २३२.०७ मीमी पर्जन्यमान झाले. या दोन्ही नोंदीत जवळपास १० टक्क्याचा फरक असल्याचे स्पष्ट होते. पर्जन्यमापकाद्वारे घेतलेल्या नोंदीनुसार २५ जुलै ते २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १३.९४ मीमी पाऊस झाला तर महावेध वेबसाईटवरून घेतलेल्या नोंदीनुसार २५ जुलै ते २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ०.६७ मीमी पाऊस झाला.काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थितीयावर्षी पाऊस सार्वत्रिक स्वरुपाचा नसल्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. २५ व २६ जुलै रोजी सर्वदूर पाऊस असताना मानोरा तालुक्यात उमरी मंडळात पाऊस नव्हता. या मंडळातील जमिनीला भेगा पडल्या असून, सोयाबीन, तूर आदी पिके सुकून जात आहेत. यामुळे शेतकरी चिंतातूर असल्याचे दिसून येते. अशीच परिस्थिती मालेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीRainपाऊस