शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे सावट; शासकीय कापूस खरेदीत अडचणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 16:02 IST

शासकीय कापूस खरेदीवर अधिकच परिणाम होण्याची भीती असून, जागेअभावी कपाशीची मोजणीही संथगतीने करावी लागत आहे.

लोकमत न्युज नेटवर्क वाशिम: पावसाळा अद्याप सुरू झाला नसताना गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी येत आहेत. अशात आधीच मजुरांच्या तुटवड्यामुळे अडचणीत असलेल्या शासकीय कापूस खरेदीवर अधिकच परिणाम होण्याची भीती असून, जागेअभावी कपाशीची मोजणीही संथगतीने करावी लागत आहे. शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी ही कसरत करावी लागत असल्याचे प्रतवारीकारांकडून सांगण्यात येत आहे.वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर, अनसिंग, कारंजा आणि मानोरा या चार ठिकाणी शासकीय कापूस खरेदी सुरू आहे. त्यात कारंजा आणि मानोरा येथे केंद्रीय कापूस महामंडळाचे (सीसीआय) उपअभिकर्ता म्हणून फेडरेशनच्यावतीने, तर अनसिंग आणि मंगरुळपीर येथे सीसीआयच कापूस खरेदी करीत आहे. खरेदी करण्यात येत असलेल्या ठिकाणीच जिनिंग करून कपाशीच्या गाठी तयार करण्यात येत आहेत. या सर्व प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज असते; परंतु २४ मार्चपासून कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणासाठी लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे जिनिंग, प्रेसिंगमध्ये कार्यरत परराज्यातील कामगार आपापल्या घरी परत गेल्याने कामगारांचा तुटवडा निर्माण झाला; परंतु शासकीय खरेदीत नोंदणी केलेल्या शेतकºयांसह इतर शेतकºयांकडे शिल्लक असलेला कापूस खरेदी करण्याच्या उद्देशाने शासन, प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार उपलब्ध कामगारांच्या आधारेच उपरोक्त चारही ठिकाणी कपाशीची खरेदी सुरू करण्यात आली आहे. रखरखत्या उन्हातही काही दिवस संभाव्य धोका पत्करून ही खरेदी सुरू असताना आता गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पडत असल्याने त्यात अधिकच अडचणी निर्माण झाल्या आहेत. कारंजा, मानोऱ्यात ७८ हजार क्विंटल खरेदी वाशिम जिल्ह्यात चार ठिकाणी कापूस खरेदी सुरू असून, त्यातील कारंजा येथील शासकीय खरेदी केंद्रावर १ जूनपर्यंत ६० हजारांहून अधिक, तर मानोरा येथील दोन केंद्रांवर मिळून १८ हजार ३०० क्विंटल कपाशीची खरेदी करण्यात आली आहे. अर्थात जिल्ह्यातील शेतकºयांकडे अद्यापही मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असून, खासगी बाजारात मिळणाºया अल्पदरामुळे त्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे धाव घेतल्याचे स्पष्ट होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमcottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्र