शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊननंतर महामार्गांच्या कामांना पावसाळ्याचा अडथळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 18:41 IST

येत्या आठवडाभरात सुरू होणाऱ्या पावसाळ्यामुळे या कामांत पुन्हा अडथळा निर्माण होणार आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : गेल्या दोन वर्षांपासून अमरावती विभागासह राज्यभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण आणि राज्यशासनाच्यावतीने महामार्गांची कामे करण्यात येत आहेत. ही कामे अंतीम टप्प्यात असताना कोरोनासाठी जारी लॉकडाऊनमुळे दीड महिना बंद पडली. अद्यापही बहुतांश कामे अपूर्ण असून, येत्या आठवडाभरात सुरू होणाऱ्या पावसाळ्यामुळे या कामांत पुन्हा अडथळा निर्माण होणार आहे.राज्यातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणने काही मार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा दिला आणि त्याची कामेही दोन वर्षांपूर्वी सुरू झाली. त्यात अमरावती विभागातील काही मार्गांचा समावेश आहे. विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणा या पाचही जिल्ह्यांत ही कामे सुरू आहेत. या कामांना सुरुवात झाल्यानंतर विविध अडचणींमुळे ती रेंगाळली. त्यानंतर कामांना वेग आला असताना आणि ही कामे पूर्णत्वाच्या दिशेने असतानाच राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने केंद्र शासनाने लॉकडाऊन जारी करून सर्वच कामांवर टाच आणली. त्यामुळे तब्बल दीड महिना ही कामे ठप्प पडली. त्यामुळे विभागातील बहुतांश कामे अपूर्णच राहिली आणि या कामांवरील कामगारांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न गंभीर झाला. त्यानंतर जवळपास महिनाभरापूर्वी या कामांसाठी शासनाने परवानगी दिली. तथापि, महिनाभरातही बहुतांश कामे पूर्ण होऊ शकली नाही. त्यात आता पावसाळा आठवडाभरावर आला असल्याने या कामांत अडचणी निर्माण होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अधिकाधिक काम पूर्ण करण्याची धडपडपावसाळा तोंडावर आला असताना राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन विविध कंत्राटदारांनी अधिकाधिक काम पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्यात लॉकडाऊनमुळे कामगार स्वराज्यात परतले असल्याने मोठी अडचण निर्माण झाली असल्याने कंत्राटदार उपलब्ध कामगारांच्या आधारे २४ तास कामे करून घेत असल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्ग