जिल्ह्यात सर्व मिळून जून ते सप्टेंबर अखेर ७८९ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. स्वतंत्र सरासरीचा विचार करता वाशिम तालुक्यात याच कालावधीत ८९३.७ मि.मी. पाऊस अपेक्षीत असतो. त्यात १ जून ते २६ ऑगस्टदरम्यान वाशिम तालुक्यात ७००.१ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना यंदा याच कालावधी ६५६.४ मि.मी. पावसाची नोंद होऊ शकली आहे. अर्थात आजवरच्या सरासरीपेक्षा ७ टक्के कमी पाऊस वाशिम तालुक्यात पडला आहे. इतर तालुक्यात मात्र आजवरच्या सरासरीपेक्षा अधिकच पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, वाशिम तालुक्यात ७ टक्के पावसाची तूट असली तरी पिकांची स्थिती मात्र समाधानकारक असून, तालुक्यातील काही महसूल मंडळात पावसाने सरासरी ओलांडली आहे. तथापि, तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजवर ७३.४ टक्के पावसाची नोंद झाली असून, पुढील महिन्यात दमदार पाऊस न पडल्यास ही तूट भरून निघू शक्यता नसून, काही गावांत पाणीटंचाईची समस्याही उद्भवण्याची भीती आहे.
-------------------
गतवर्षीपेक्षा ९ टक्के कमी पाऊस
वाशिम तालुक्यात वार्षिक सरासरी ८९२.७ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो, तर १ जून ते २६ ऑगस्टदरम्यान ७००.१ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना यंदा या कालावधीत ६५६.४ मि.मी. पावसाची नोंद होऊ शकली आहे. गतवर्षी याच कालावधीत वाशिम तालुक्यात ७१६.९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. अर्थात गतवर्षी उपरोक्त कालावधीत अपेक्षीत सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडला होता. यंदा मात्र याच कालावधित ६५६.४ मि.मी. पावसाची नोंद होऊ शकली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण ९ टक्के कमी आहे.
-------------------
मंगरुळपीर तालुक्यात विक्रमी सरासरी
जिल्ह्यात आजवर अपेक्षीत सरासरीच्या तुलनेत ११२.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे, त्यात मंगरुळपीर तालुक्यात मात्र पावसाने विक्रमी सरासरी गाठली आहे. या तालुक्यात १ जून ते २६ ऑगस्टरदम्यान ५५३.६ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. तर यंदा या कालावधित ७९०.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधित ७६७.९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.
०००००००००००००००००००००००००००
पावसाचे तालुकािनहाय प्रमाण (मि.मी.)
तालुका - अपेक्षित - प्रत्यक्ष
वाशिम - ७००.१ - ६५६.४
रिसोड - ६०१.१ - ६५९.९
मालेगाव - ५९१. ६ - ७४६.१
मंगरुळ - ५५३.७. -७९०.६
मानोरा - ५४६.२. - ७५१.००
कारंजा - ५७७.५. -५४५.३