शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

पावसामुळे ९०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान; भरपाई केव्हा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:40 IST

वाशिम : जिल्ह्यात ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे ९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज ...

वाशिम : जिल्ह्यात ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे ९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, नुकसानभरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. दरम्यान, यापूर्वीच्या पीक नुकसानाची भरपाई अद्याप मिळाली नसल्याने शासनाकडून भरपाई केव्हा मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षीच नानाविध संकटांना सामोरे जावे लागते. गतवर्षीदेखील अतिवृष्टीमुळे पीक नुकसानाला सामोरे जावे लागले होते. यंदाही नैसर्गिक आपत्तीसमोर शेतकरी हतबल होत असल्याचे दिसून येत आहे. २१ ते २३ जुलै दरम्यान अतिवृष्टी झाल्याने ३२७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तसेच ४३३ हेक्टर जमीन खरडून गेली. या नुकसानाची भरपाई अद्याप मिळालेली नसतानाच, पुन्हा ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान संततधार पावसाने जवळपास ९०० हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. १००पेक्षा अधिक हेक्टरवरील जमीन खरडून गेली आहे. कृषी व महसूल प्रशासनाकडून नुकसानाचे पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पीककर्जाची परतफेड कशी करावी? या चिंतेने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

.........................................

२१ ते २३ जुलै दरम्यान पावसामुळे झालेले नुकसान : ३२७६ हेक्टर

५ ते ७ सप्टेंबर दरम्यान पावसामुळे झालेले नुकसान : ९०० हेक्टर

.........................................

नुकसानभरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष

पीक नुकसान, जमीन खरडून जाणे, घरांची पडझड आदी प्रकरणी शासनाकडून पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते. जुलै महिन्यातील नुकसानाचा अहवाल शासनाकडे पाठवून दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यातच सप्टेंबर महिन्यातील पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. शासनाकडून भरपाई नेमकी केव्हा मिळणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

...............

कोट बॉक्स

जिल्ह्यात ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान पावसामुळे ९०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त भागात पंचनामे केले जात आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानभरपाईसंदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविला जाईल.

- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

०००००००००००००

कोट

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला. शासनाने नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित आहे. दिरंगाई होत असल्याने शासनही शेतकऱ्यांप्रति संवेदनशील नसल्याचे दिसून येते.

- श्याम बढे, प्रगतशील शेतकरी, रिधोरा