शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मोप आरोग्य केंद्रात रॅबीज लसीचा तुटवडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 16:32 IST

थील पाच जणांना कुत्र्याने चावा घेतला असून, या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅबीज लस मिळाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कभर जहॉगीर (वाशिम) : येथून जवळच असलेल्या मोप प्राथमिक आरोग्य केंद्रात गत १५ दिवसांपासून रॅबीज लसीचा तुटवडा असल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचार घेण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपूर्वी येथील पाच जणांना कुत्र्याने चावा घेतला असून, या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅबीज लस मिळाली नाही.गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावे याकरीता ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. मोप प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत भर जहॉगीर गावासह जवळपास ३० ते ३५ गावांचा समावेश आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर अन्य प्रकारची औषधी उपलब्ध आहे; मात्र कुत्र्याने चावा घेतल्यानंतर प्रतिबंधात्मक  उपाययोजना म्हणून रॅबीज लस उपलब्ध नाही. लसीचा तुटवडा असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. लसीसाठी रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, आरोग्य विभागाने त्वरित ही लस उपलब्ध करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड यांनी शनिवार ३० मे रोजी केली. मोप प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सात ते आठ उपकेंद्र आहेत. या परिसरात  सध्या पिसाळलेल्या व भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. शुक्रवारी एकाच दिवशी पाच लोकांना कुत्र्याने चावा घेतला. उपचारार्थ सर्व जण आरोग्य केंद्रात गेले असता, रॅबीज लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. श्वान दंश झाल्यानंतर बचाव करण्यासाठी आरोग्य केंद्र व उपकेंद्रात प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असणे आवश्यक आहे. रिसोड तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्र व  उपकेंद्रात ही लस उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी औषधी दुकानातून लस विकत घ्यावी लागते.  वरिष्ठांकडे मागणी नोंदविली आहेरॅबीज लस ही रिसोडमध्येच उपलब्ध नाही. आरोग्य केंद्र व उपकेंद्रात रॅबीज लस सद्यस्थितीत उपलब्ध नाही. रॅबीज लस उपलब्ध करावी, याकरीता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर तातडीने पुरवठा केला जाईल, असे वरिष्ठांनी सांगितले, अशी माहिती मोप आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर सिंग यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिम