शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रेबीज लसींचा तुटवडा: श्वानदंशाचे रुग्ण ‘रेफर टू अकोला’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 14:40 IST

रेबीज लसींचा तुटवडा निर्माण झाला असून अशा प्रकारातील रुग्णांना थेट ‘रेफर टु अकोला’ केले जात असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : रुग्णांच्या सेवेसाठी सदैव कार्यतत्पर असणे अपेक्षित असताना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध स्वरूपातील असुविधांमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. रानडुक्कर, श्वानदंश झाल्यानंतर जीवघेण्या आजाराची लागण होऊ नये, यासाठी त्यास द्याव्या लागणाऱ्या रेबीज लसींचा तुटवडा निर्माण झाला असून अशा प्रकारातील रुग्णांना थेट ‘रेफर टु अकोला’ केले जात असल्याचे दिसून येत आहे.९ जून रोजी शेतात काम करताना पांगरखेड येथील सोनू उर्फ गोविंदा संपत धबडधाव आणि सुनील सुभाष गावंडे या दोन युवकांवर रानडुकराने हल्ला केल्याने दोघेही जबर जखमी झाले. यासह २५ जून रोजी दुधाळा येथे शेतात काम करित असताना शिवकन्या राजाराम जाधव आणि सुरेश चिनकू काळे या दोघांवर रानडुकराने हल्ला करून चावा घेतला. एकाच महिन्यात घडलेल्या या घटनांमधील रुग्णांना उपचाराकरिता शिरपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र रेबीज लस उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी अकोला येथे धाव घ्यावी लागली. यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.तथापि, आरोग्य विभागाने ही बाब लक्षात घेवून रेबीज लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. शिरपूर प्राथमिक आरोग् केंद्राचा कारभार वाºयावर!शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रावर परिसरातील ५९ गावांमधील रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आहे. असे असताना रुग्णांची गैरसोय होत आहे. २४ जूनच्या रात्री संजय मोतीराम पोफळे या इसमास त्याच्या भावाने डोक्यात दगड मारून जखमी केले. पोलिसांनी संजयला उपचारासाठी शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते; तर बिनपगारी रखवाली करणारा एक व्यक्ती झोपून होता. त्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव संजयला मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करावे लागले. यावरून शिरपूर ‘पीएचसी’चा कारभार पूर्णत: वाºयावर असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमAkolaअकोलाhospitalहॉस्पिटल