शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टेरका येथील गौण खनिजाच्या मोजणीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 17:59 IST

ढीग व्यवस्थित नसल्याचा अभिप्राय असल्याने आणि कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या मंडळ अधिकाºयांचा समावेश असल्याने साशंकता वर्तविली जात आहे.

संतोष वानखडेवाशिम : मानोरा तालुक्यातील टेरका येथील गौण खनिज अवैध उत्खनन प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर, पंचनामा, कार्यालय व मशिन सील करण्यात आले. त्यानंतर आता संयुक्त पथकाने मोजणी करून तहसिलदारांकडे अहवाल सादर केला. परंतू, या अहवालात गौण खनिजाचा ढीग व्यवस्थित नसल्याचा अभिप्राय असल्याने आणि कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या मंडळ अधिकाºयांचा समावेश असल्याने साशंकता वर्तविली जात आहे.जिल्हा खनिकर्म विभागाकडून कोणत्याही प्रकारचा परवाना मिळालेला नसताना, मानोरा तालुक्यातील टेरका (ऊ) येथे ३० ते ४० हजारापेक्षा अधिक ब्रास दगड उत्खनन झाले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने ३१ आॅगस्टच्या अंकात सचित्र वृत्त प्रकाशित करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. याची तडकाफडकी दखल घेत जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी योग्य ती चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश मानोरा तहसिलदारांना दिले होते. दरम्यान या संदर्भात महसूल राज्यमंत्र्यांदेखील रॉयल्टी भरून घेण्याचे आदेश अपर जिल्हाधिकाºयांना दिले होते. टेरका येथील गट नंबर १७/१ व १७/२ मधून आतापर्यंत किती ब्रास गौण खनिज उत्खनन झाले याची निश्चित माहिती काढण्यासाठी सात अधिकाºयांचे संयुक्त मोजणी पथक गठीत करण्यात आले. यामध्ये कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या मंडळ अधिकाºयांचादेखील समावेश असल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. या पथकाने संयुक्त मोजणी करून तहसिलदारांकडे अहवाल सादर केला. सदरील साठ्याचा ढीग योग्यरितीने लावून न ठेवल्यामुळे तसेच खदानीचे जमिनीची प्रारंभिक पातळी उपलब्ध न केल्यामुळे सरासरी खोली घेऊन परिमाण काढण्यात आले आहे. त्यामुळे यावर तक्रारदाराने आक्षेप नोंदविला आहे. टेरका येथील संयुक्त मोजणी पथकाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. कुणाचीही गय केली जाणार नाही. डॉ. विनय राठोडजिल्हा खनिकर्म अधिकारी, वाशिम संयुक्त मोजणी पथकाचा अहवाल प्राप्त झाला आहे. गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू असतानाही याकडे दुर्लक्ष का करण्यात आले यासंदर्भात तलाठी व मंडळ अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अद्याप त्यांचा खुलासा प्राप्त झाला नाही. खुलासा प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाईल.डॉ. सुनील चव्हाण,तहसिलदार, मानोरा

टॅग्स :washimवाशिमRevenue Departmentमहसूल विभाग