लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्हयातील बाजार समितीमध्ये बाहेर जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा मोठ्या संख्येने सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत.त्यामुळे वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र बाजारसमिती समाेर दिसून येते. ४ नाेव्हेंबर राेजी एकाच दिवशी जिल्हयातील ५ बाजार समित्यांमध्ये ३१ हजार २८८ क्विंटल साेयाबीनची खरेदी करण्यात आली. भावात मात्र सर्वच ठिकाणी तफावत असल्याचे दिसून आले.यावषीर् झालेल्या जाेरदार पावसामुळे साेयाबीन पिकाचे माेठया प्रमाणात नुकसान झाले. तरी सुध्दा बाजारामध्ये साेयाबीनची आवक माेठया प्रमाणात दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांचा माल ओलाव्याच्या नावाखाली कमी भावाने घेतल्या जात असल्याने शेतकरी त्रस्त आहे. अनेक शेतकऱ्यांना पेरणीचा खर्चही साेयाबीनमधून निघालेला नाही. जिल्हयातील बाजार समितींमध्ये साेयाबीनला ईतर जिल्हयाच्या तुलनेत चांगला भाव मिळत असल्याने परजिल्हयातील मालही विक्रीस येत असल्याचे चित्र आहे. वाशिम येथील बाजार समितीमध्ये साेयाबीनला ४५०० भाव मिळत आहे. तर कारंजा येथे ३७७५, मंगरुळपीर ४२९५, रिसाेड व मानाेरा येथे ४२०० रुपये भाव मिळत आहे. जिल्हयातील बाजार समितीमध्ये घेत असलेल्या भावामध्ये चांगलीच तफावत दिसून येत आहे.
एका दिवसात ३१ हजार क्विंटल साेयाबीनची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 17:02 IST