ज्ञानेश्वरीवर प्रवचन करताना सिध्द सदगुरू शांतीनाथ महाराज म्हणाले की, जो भक्त अंतर्ज्ञानाने नतमस्तक होतो त्यास पायावर डोके ठेवण्याची गरज नाही. दर्शन करताना शरीरातील सर्व इंद्रियात महत्त्वपूर्ईंद्रिय डोळा, चक्षू आहे. ज्या भक्ताने या ‘नैनची पाहावे नैन, मनची शोधावे मन’ ही क्रिया केली. त्यास नमस्कार व दर्शन काय हे समजेल. दरम्यान, सिद्ध सद्गुरू गोरक्षनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरू गीता वाचन करण्यात आले व नवनाथ ग्रंथाची समाप्ती कार्यक्रम करण्यात आला. सिद्ध सद्गुरू शांतीनाथ महाराज, रंगनाथ महाराज, अलखनाथ महाराज, धर्मनाथ महाराज, महेशनाथ महाराज, गोपाल महाराज, ह.भ.प. एकनाथ भिंगारे महाराज, पंकज ठाकरे व भक्तगण यांच्या उपस्थितीत सिध्द सद्गुरू गोरक्षनाथ महाराज यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीचा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. धार्मिक पूजाविधी करण्यात आली.
कारंजा येथे गोरक्षनाथ महाराजांची पुण्यतिथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:21 IST