रिसोड : कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्याकरिता नगर परिषद प्रशासन अलर्ट झाले असून २१ फेब्रुवारीला जास्त नागरिक आढळून आल्याने शहरातील दोन मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.लग्न समारंभात मंगल कार्यालयांमध्ये ५० व्यक्तींना परवानगी देण्यात आली. यापेक्षा अधिक व्यक्ती आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिलेले आहेत. रिसोड शहरामधील भोमावत मंगल कार्यालय व जी. बी. लॉन येथील लग्न समारंभात ५० पेक्षा अधिक व्यक्ती आढळून आल्याप्रकरणी प्रत्येकी दहा हजाराचा दंड ठोठावण्यात आला. नगर परिषद प्रशासनाने लग्न समारंभात भेट देऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. मंगल कार्यालय प्रशासनाने कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे असे आवाहन मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले.
दोन मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 16:31 IST