शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या पीक नुकसानाचे होणार पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 18:14 IST

विभागीय आयुक्तांनी २६ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिले आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयात विहित केलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक मदतीचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सुचना कृषी उपसचिवांनी २५ आॅगस्टच्या पत्रान्वये सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी २६ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिले आहे.यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच शेतकºयांना निसर्गाच्या अनियमिततेचा फटका बसत आहे. त्यात जूनच्या मध्यंतरी पावसाचा खंड सोडला, तर जुन अखेरपासून मागील दोन महिन्यात वारंवार अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात उडिद, मुग ही पिके सततच्या पावसामुळे खराब होऊन काढणी योग्यही राहिली नाहीत, तर अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकºयांच्या जमिनीसुद्धा खरडून गेल्या. त्यानंतर जुलैच्या अखेरपासून पावसाने संततधार लावल्याने नदी, नाल्यांना पूर गेले, त्यामुळे शेतात पाणी साचून सोयाबीन पीक पिवळे पडून सुकले आहे. इतरही खरीप पिकांची स्थिती अत्यंत वाईट झाल्याने शेतकºयांनी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता राहिली नाही. शेतकºयांच्या या नुकसानाचा विचार करून शासनाने अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानापोटी शेतकºयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कृषी उपसचिवांनी सर्व विभागी आयुक्तांना २५ आॅगस्ट रोजी पत्र पाठवून पीक नुकसानाचे पंचनामे करण्याच्या सुचना देण्याचे निर्देश दिले, तर विभागीय आयुक्तांनी २६ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकाºयांना या संदर्भात पत्र देऊन शासन निर्णयात विहित केलेल्या दराने बाधित शेतकºयांना मदत करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जूनमधील नुकसानाची पाहणी कशी करणारकृषी उपसचिवांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार जून-आॅगस्ट २०२० मध्ये अतिवृष्टी आणि पुराने झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश आहेत. त्यात जुलै अखेर आणि आॅगस्टमधील नुकसानाचे पंचनामे करून प्रस्ताव सादर करणे शक्य असले तरी, जून महिन्यात अर्थात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नुकसानाचे पंचनामे कोणत्या पद्धतीने करणार, शेतकºयांचे नुकसान निश्चित करण्यासाठी कोणते निकष लावणार, असा प्रश्न उपस्थीत होत आहे. त्यात काही ठिकाणी महसूल विभागाने पूर्वीच पाहणी केली असली तरी, बहुतांश भागांत जूनमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणीच झाली नाही. अशा शेतकºयांना आता मदत कशी देणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती