शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात कडधान्याचा पेरा वाढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 14:09 IST

   वाशिम - गतवर्षी राज्यभरात कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला त्यातच यंदा राज्यात बोगस बीटी बियाणे दाखल झाल्याची शंका खुद्द कृषी विभागानेच व्यक्त केली असून, काही जिल्ह्यात हे बियाणे आढळूनही आले आहे.

ठळक मुद्दे यंदा वाशिम जिल्ह्यात तूर, मुग, उडिद या पिकांचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. बोगस बीटी बियाणे राज्यात दाखल झाल्याच्या चर्चेने शेतकरी अधिकच धास्तावले आहेत. मुगाच्या पेरणीचे नियोजनही गतवर्षीच्या तुलनेत यंदा २५५५ हेक्टरने अधिक करण्यात आले.

  वाशिम - गतवर्षी राज्यभरात कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला त्यातच यंदा राज्यात बोगस बीटी बियाणे दाखल झाल्याची शंका खुद्द कृषी विभागानेच व्यक्त केली असून, काही जिल्ह्यात हे बियाणे आढळूनही आले आहे. या पृष्ठभूमीवर यंदा वाशिम जिल्ह्यात तूर, मुग, उडिद या पिकांचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. कृषीतज्ज्ञांनीही असा अंदाज व्यक्त केला असून, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कृषी संचालकांकडे पाठविण्यात आलेल्या नियोजन अहवालांतच कडधान्याच्या पेºयाचे वाढीव क्षेत्रावर नियोजन के ल्याचे नमूद करण्याम आले आहे. अमरावती विभागात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागलेच शिवाय निकृष्ट बियाण्यांनीही शेतकºयांचा घात केला. प्रामुख्याने बोंडअळीचा विभागातील शेतकºयांना फटका बसला. कपाशीच्या पिकाला न मिळणारे अपेक्षीत दर, तसेच वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आधीच अमरावती विभागातील शेतकºयांनी या पिकाकडे पाठ केली आहे.  बीटी बियाण्यांची घटलेली क्षमता शेतकºयांना भेडसावत असतानाच बोगस बीटी बियाणे राज्यात दाखल झाल्याच्या चर्चेने शेतकरी अधिकच धास्तावले आहेत. अर्थात, आधीच नैसर्गिक संकटे पिच्छा पुरवित असताना त्यात कपाशीची पेरणी करून अधिक नुकसान कशाला ओढवून घ्यायचे, अशी मानसिकता शेतकºयांची झाली आहे. त्यामुळेच यंदा कडधान्याचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या कृषी विभागानेही यंदाच्या पेरणी नियोजनात कपाशीचे क्षेत्र कमी केले आहे, तर तुर, मुग आणि उडिदाचे क्षेत्र वाढविले आहे.  वाशिम जिल्ह्यात कपाशीच्या पेरणीचे नियोजन मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ७४२१ हेक्टरने कमी करण्यात आले आहे, तर तुरीचे क्षेत्र ४४८५ हेक्टरने वाढविण्यात आले आहे. मुगाच्या पेरणीचे नियोजनही गतवर्षीच्या तुलनेत यंदा २५५५ हेक्टरने अधिक करण्यात आले, तर उडिदाचे क्षेत्र ८४ हेक्टर वाढविण्यात आले आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातही यापेक्षा कमीअधिक प्रमाणात कडधान्याचा पेरा वाढण्याचा अंदाज कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती