पोलिओचे उच्चाटन करण्यासाठी शासनाच्या आदेशान्वये आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकासाठी जि.प. आयुर्वेदिक दवाखान्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात ३१ जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात आले. जि.प. सदस्य अशोकराव डोंगरदिवे यांच्या हस्ते बालकाला पल्स पोलिओचा डोस पाजून अभियानाला सुरुवात करण्यात आली. हे अभियान आणखी तीन दिवस चालणार असल्याचे येथील आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत वाघमारे यांनी सांगितले. याप्रसंगी कोडापे, राजू उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. प्रशांत वाघमारे, आरोग्य पर्यवेक्षक ए. जी. सोनोने, आरोग्य सेवक संदीप खुळे, आरोग्य कर्मचारी कैलास उपाध्ये आरोग्य परिचारिका योगिता वानखडे, मंजू जाधव काम करीत आहेत. त्यांना अंगणवाडी सेविका कविता उपाध्ये, वनमाला बंड, आशा सेविका बेबी अंभोरे सहाय्य करीत आहेत.
काजळेश्वर येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात पल्स पोलिओ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:21 IST