शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा सार्वजनिक बांधकाम उपविभाग नावापुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 14:24 IST

मानोरा (वाशिम) : सार्वजनिक बांधकाम निर्माण उपविभाग, वाशिम या कार्यालयाचे मानोरा येथे स्थानांतरण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा (वाशिम) : सार्वजनिक बांधकाम निर्माण उपविभाग, वाशिम या कार्यालयाचे मानोरा येथे स्थानांतरण करण्यात आले आणि या उपविभागाचे नाव आता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मानोरा असे करून हे कार्यालय १२ आॅगस्ट २०१८ पासून मानोरा येथे सुरु करण्यात आले; परंतु अद्यापही मानोरा येथून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामकाज चालत नसून, या अंतर्गत येणारी कामे मंगरुळपीर येथूनच करण्यात येत आहेत.सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयासाठी मानोरा येथे इमारत नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांसाठी असलेल्या निवासस्थानाच्या इमारतीत कार्यरत करण्यात आले. तर नव्याने शासनाच्या अर्थसंकल्पात समाविष्ट रस्ते व इमारतीची कामे, पोहरादेवी विकास आराखड्याची कामे, नगरपंचायत मानोरा प्रशासकीय इमारतीचे काम आदी कामांची अंदाजपत्रके बनविणे, ई-निविदा प्रपत्रे तयार करणे ही कामे तातडीच्या स्वरुपाची असल्याने या कार्यालयाचे कामकाज विश्रामगृह मानोरा येथून व संगणकावर करावयाची अंदाजपत्रके/निविदा प्रपत्रे ही कामे वाशिम येथील पूर्वीच्या कार्यालयातून करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले, तसेच इमारतीची दुरुस्ती व विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर कार्यालय पूर्ण स्वरुपात कार्यान्वित होईल व सदर कार्यालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले; परंतु प्रत्यक्षात या कार्यालयाकडून करावी लागणारी कामे मंगरुळपीर सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे वर्ग करण्यात आली असून, मानोरा सार्वजनिक बांधकाम उपविभागाची निर्मिती केवळ नावापुरतीच झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा