शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील कलापथकांना मिळणार जनजागृतीचे कार्यक्रम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 14:24 IST

वाशिम :   गत एक ते दीड वर्षांपासून कलापथकाच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी केली जात नसल्याने जिल्ह्यातील कलावंतांवर उपासमारीची वेळ आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित केले होते. याची दखल घेत आता जिल्हा प्रशासनाने कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत.

ठळक मुद्दे जिल्हा प्रशासनाने कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत.यासंदर्भात ‘लोकमत’ने २७ नोव्हेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.वाशिम जिल्हयातील कलापथक, संस्थांंना प्राधान्य देण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

वाशिम :   गत एक ते दीड वर्षांपासून कलापथकाच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी केली जात नसल्याने जिल्ह्यातील कलावंतांवर उपासमारीची वेळ आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित केले होते. याची दखल घेत आता जिल्हा प्रशासनाने कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत.जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयांतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या योजना, विशेष घटक योजना व अन्य शासकीय योजनांविषयी वाशिम जिल्ह्यात सन २०१० ते २०१५ पर्यत कलापथकाचे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले होते. परंतु दीड वषार्पासून हे कार्यक्रम जिल्हयात राबविले जात नसल्यामुळे कलावंतांची उपासमार होत आहे. इतर जिल्हयात हे कार्यक्रम राबविल्या जात आहेत. इतर जिल्हयात कार्यक्रम देण्यास बाहेरील जिल्हयातील कलावंतांना नाकारण्यात येत आहे. याबाबत संबंधित विभागात चौकशीदरम्यान निधी नसल्याचे कारण सांगण्यात येत होते. शासकीय योजनांसंदर्भात जनजागृतीपर कार्यक्रम मिळत नसल्याने सेवाभावी काम करणाºया लोककलावंतांवर अन्याय होत आहे, अशी आपबिती लोककलावंतांनी जिल्हा प्रशासनाकडे मांडली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने २७ नोव्हेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आता जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाने जिल्ह्यातील संभाव्य आपत्तीप्रवण रिसोड व वाशिम तालुक्यातील गावांमध्ये कलापथकाच्या माध्यमातून संभाव्य पूर, आग, वीज, अपघात, साथरोग, शितलहर, उष्मघात आदी संभाव्य आपत्तीबद्दल जनजागृती करण्यासाठी वाशिम जिल्हयातील कलापथक, संस्थांकडून २२ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले आहेत. वाशिम जिल्हयातील कलापथक, संस्थांंना प्राधान्य देण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिम