शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीर तालुक्यात चित्रफितीद्वारे ‘जलसंधारणा’ची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 15:46 IST

मंगरूळपीर (वाशिम) : सिनेअभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे मंगरुळपीर तालुक्यातील बहुतांश गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी संमती दर्शविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर (वाशिम) : सिनेअभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे मंगरुळपीर तालुक्यातील बहुतांश गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी संमती दर्शविली आहे. त्यानुसार या गावांमध्ये चित्रफितीद्वारे जलसंधारणाच्या कामांसंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. पाणी फाउंडेशनतर्फे गावोगावी जलसंधारणाची कामे व्हावी याकरीता ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले जात आहे. वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी गावांत जलसंधारणाची कामे कशा प्रकारे करावी यासह अन्य विषयांसंदर्भात गावकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक समाधान वानखडे, अतुल तायडे, सामाजिक प्रशिक्षक दीपमाला तायडे, मयुरी काकड़, तांत्रिक प्रशिक्षक कल्याणी वडस्कर, निलेश भोयर यांनी गावोगावी जनजागृतीची मोहिम हाती घेतली आहे. तालुक्यातील चकवा, घोटा , मजलापुर, तपोवन, जनुना बू, गिंभा, पोघात,  पिंर्पी खु , चेहल , चिंचाळा, मानोली , पिंप्रि अवगण , बोरव्हा बू , लखमापुर, सार्सी , नादगांव, अरक, निंबी, रामगड, गणेशपूर, उमरी येथे गावसभा, ग्रामसभा घेऊन गावकº्यांना प्रोजेक्टरव्दारे माहिती दिली जात आहे. दुष्काळातुन समृद्धिकड़े, चला हवा येऊ द्या, तुफान आल या, झाले गेले ते विसरून सारे गावाचा विकास करायचे आदीे चित्रफीत दाखवून मंगरुळपीर तालुक्यातील जनजागृती केली जात आहे. ज्या गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग निश्चित केलेला आहे, त्या गावाला जलचळवळमधे सहभागी होण्याचे आवाहन चमूद्वारे केले जात आहे. सर्वांना वॉटर कप स्पर्धेविषयी माहिती  व चार दिवसाचे निवासी ‘जलसंधारण ते मनसंधारण’ या प्रशिक्षणाला गावपातळीवरचे सरपंच, ग्रामरोजगार सेवक, सेवानिवृत शिक्षक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ता, दोन महिला जे  अंगनवाडी सेविका, मदतनिस, बचत गटाच्या महिला कोणी प्रशिक्षणासाठी येऊ इच्छित असेल तर त्यांचीही निवड प्रशिक्षणासाठी करता येणार आहे, असे मान्यवरांनी सांगितले. दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदर गावातील सरपंच, सचिव, ग्राम पंचायत कर्मचारी, गावातील जलमित्रांची मदत होत असल्याचे सांगून तालुक्यात व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे., असे तालुका समन्वयक वानखडे यांनी सांगितले. पाणी फाऊंडेशनच्यावतीने चार दिवशीय निवासी प्रशिक्षण  शिबीराचे आयोजन केले असल्याने वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी होऊन यांमध्ये जलसंधारण व मनसंधारण करून गाव पाणीदार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन वानखडे व चमूने केले आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर