शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडचा अभ्यासदौरा आटोपून लोकलेखा समिती नेदरलँडमध्ये मध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 12:31 IST

वाशिम : महाराष्ट्र विधिमंडाळाची लोकलेखा समिती इंग्लंडचा अभ्यास आटोपून ८ सप्टेंबरला नेदरलँडमध्ये दाखल झाली.

ठळक मुद्देसमितीत आमदार पाटणी यांचा समावेश.इग्लंडच्या शासनप्रणालीचा अभ्यास.

समितीत आमदार पाटणी यांचा समावेश : इग्लंडच्या शासनप्रणालीचा अभ्यासलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र विधिमंडाळाची लोकलेखा समिती इंग्लंडचा अभ्यास आटोपून ८ सप्टेंबरला नेदरलँडमध्ये दाखल झाली. या समितीत उत्कृष्ट संसदपटू म्हणून लौकिक असणारे आमदार राजेंद्र पाटणी यांचा समावेश असून, इंग्लंडमध्ये सदर समितीने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील जगविख्यात स्मारक, भारत भवन, ब्रिटिश संसदेचे हाऊस आॅफ कॉमन्स, हाऊस आॅफ लॉर्ड आदी ठिकाणांना भेटी देत शासन प्रणालीचा अभ्यास केला.विधिमंडळाच्या लोकलेखा समितीत दोन्ही सभागृहातील निवडक अभ्यासू आमदारांचा समावेश आहे. आमदार राजेंद्र पाटणी हे सदर समितीचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यावर्षी सदर समिती विदेशाच्या अभ्यास दौºयावर गेली आहे. समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील जगविख्यात स्मारक व संग्रहालयाला भेट दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सन १९२१ व १९२२ असे दोन वर्षे लंडनमध्ये वास्तव्यास होते. या समितीने लंडनमधील भारताचे ‘इंडिया हाऊस’ येथे उच्चायोगाला भेट दिली व भारताचे उच्चायुक्त वाय. के. सिन्हा यांच्यासमवेत चर्चा केली.ब्रिटीश संसदेच्या हाउस आॅफ कॉमन्स (लोकसभा) तथा हाऊस आॅफ लॉर्डला भेट दिली. यावेळी समितीमधील आमदारांनी ब्रिटीश लोकसभा अध्यक्ष तसेच ब्रिटीश खासदारांसोबत लंडन मधील संसदेची इमारत असलेल्या  वेस्टमिन्स्टर राजवाडा येथील बैठकीत चर्चा केली. त्यानंतर समितीने  इंग्लंडच्या लोकलेखा समिती पदाधिकाºयांसोबत चर्चा केली. इंग्लंडच्या राणीचा जगविख्यात बंगला बॅकिंगहॅम पॅलेसला भेट देवून समितीने इग्लंडचा निरोप घेतला.

विधीमंडळाच्या लोकलेखा समितीचे प्रतिनिधी म्हणून इग्लंडच्या शासन प्रणालीचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देता आली. या अभ्यासाचा भविष्यात विकासात्मक कामे करताना निश्चिततच फायदा होईल. - राजेंद्र पाटणीआमदार, कारंजा विधानसभा मतदारसंघ

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणी