शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘सॅनिटरी नॅपकिन’साठी नाविण्यपूर्ण योजनेतून निधीची तरतूद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 13:46 IST

वाशिम : ग्रामीण भागातील महिला व युवतींना माफक दरात ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ पुरविण्याच्या उद्देशाने ८ मार्च २०१८ पासून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  ‘अस्मिता’ योजना सुरू करण्यात आली.

ठळक मुद्दे विद्यार्थिनींना ‘सॅनिटरी नॅपकिन’चा पुरवठा करण्यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून जवळपास ६ लाख रुपयांची तरतूद केली जाणार.या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शासनाने महिला बचतगटांवर सोपविण्याचा निर्णय घेतला होता. प्राप्त निधीतून ‘सॅनिटरी नॅपकिन’ची खरेदी केल्यानंतर विद्यार्थिनींना ‘सॅनिटरी नॅपकिन’चे वितरण केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागातील महिला व युवतींना माफक दरात ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ पुरविण्याच्या उद्देशाने ८ मार्च २०१८ पासून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  ‘अस्मिता’ योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत विद्यार्थिनींना ‘सॅनिटरी नॅपकिन’चा पुरवठा करण्यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून जवळपास ६ लाख रुपयांची तरतूद केली जाणार असून, तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाºयांकडे पाठविला आहे.‘अस्मिता’ योजनेमुळे तळागाळातील युवती व महिलांपर्यंत त्यांच्या मासिक पाळीदरम्यान आरोग्याची काळजी घेण्याबद्दल जागृती होईल तसेच या कारणामुळे शाळांमधील विद्यार्थीनींचे महिन्यातून ठराविक चार ते पाच दिवस गैरहजर राहण्याचे प्रमाण घटेल, हा उद्देश बाळगण्यात आला. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शासनाने महिला बचतगटांवर सोपविण्याचा निर्णय घेतला होता. यामाध्यमातून बाजारपेठेत तुलनेने महाग असलेली ‘सॅनिटरी नॅपकिन’ केवळ पाच रुपयांमध्ये ग्रामीण भागातील गोरगरिब कुटूंबातील गरजू युवती व महिलांना दिली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिला बचतगटांनाही रोजगार मिळेल आणि महिला व मुलींच्या आरोग्याचा प्रश्नही निकाली निघेल, असा दुहेरी फायदा साध्य होणार  आहे. या महत्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी मध्यंतरी झाली नाही. ‘सॅनिटरी नॅपकिन’साठी जिल्हा परिषदेकडूनही निधीची तरतूद व्हावी याकरिता नाविण्यपूर्ण योजनेतून निधीला मंजूरी मिळावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव सादर केला आहे. निधी प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर प्राप्त निधीतून ‘सॅनिटरी नॅपकिन’ची खरेदी केल्यानंतर विद्यार्थिनींना ‘सॅनिटरी नॅपकिन’चे वितरण केले जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालयWashim ZPवाशीम जिल्हा परिषद