शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुरुस्तीसाठी सिंगडोहवासी रस्त्यावर; २ तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 17:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर ( वाशिम ) : तालुक्यातील सिंगडोह-जोगलदरी या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था असल्याने ग्रामस्थांना त्रास होत ...

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम) : तालुक्यातील सिंगडोह-जोगलदरी या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था असल्याने ग्रामस्थांना त्रास होत आहे. वारंवार मागणी करूनही रस्ता दुरुस्ती न झाल्याने अखेर सिंगडोहवासियांनी मानोरा-मंगरुळपीर मार्गावर जोगलदरी फाट्यानजिक शुक्रवारी रास्तारोको आंदोलन केले. यामुळे मार्गावरील वाहतूक तब्बल २ तास ठप्प झाली होती. सिंगडोह (सिंगणापूर) ते जोगलदरी फाटा या ३ किलोमीटर अंतराच्या डांबरीकरण रस्त्याचे काम २००१ मध्ये झाले होते; परंतु सदर काम निकृष्ट झाल्यामुळे हा रस्ता पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेला. त्यामुळे १६ वर्षांपासून येथील सिंगडोह येथील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सिंगडोह गावाची लोकसंख्या १७०० ते २००० हजार असून, विद्यार्थी, शेतकरी व गावकºयांना मंगरुळपीर व मानोरा येथे येजा करण्यासाठी हाच रस्ता आहे. तथापि,  ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्याची चाळणीच झाली आहे. या खड्ड्यांमुळे अनेकदा किरकोळ अपघातही घडले आहेत.  सिंगडोह येथील बाळ चव्हाण यांनी सदर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत शासन, प्रशासन दरबारी मागील वर्षभरापासून पाठपुरावा केला; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांत रोषाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून २ नोव्हेंबर रोजी रास्तारोकोचा इशारा दिला होता. त्यानुसार सिंगडोहच्या ग्रामस्थांनी जोगलदरी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे २ तास वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपअभियंता आठवले यांनी लेखी पत्र देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन