आल इंडिया पोल्ट्री पेंड असोसिएशनच्या मागणीनुसार हा निर्णय मोदी सरकारने घेतला. याचा थेट परिणाम सोयाबीनच्या भावावर होणार असून, चुकीचा पायंडा सरकार पाडत असल्याची संतप्त प्रतिक्रिया भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी दिली आहे. आयात करत असताना पशुखाद्य म्हणून आयातीस सरकारकडून परवानगी देण्यात आली असली तरीही, त्याचे परिणाम सोयाबीन बाजारावर होणार आहेत. ज्याप्रमाणे दाळवानाच्या चुकीच्या आयात धोरणाचा परिणाम दाळवर्गीय वाणाच्या उत्पादनावर झाला, तसाच चुकीचा परिणाम तेलबिया उत्पादनावर सुद्धा भविष्यात होऊ शकतो. या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत. शासनाने सरसकट जनुकीय बदल असलेल्या बियाणांना परवानगी द्यावी, त्यामुळे किमान शेतकऱ्यांचा तरी भविष्यात फायदा होईल. उत्पादन खर्च कमी होऊन हेक्टरी उत्पादन वाढेल. घेतलेला जी.एम. सोयापेंड आयातीचा निर्णय निषेधार्ह असल्याचे ‘भूमिपुत्र’कडून प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे.
जनुकीय बदल सोयापेंड आयातीबाबत भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST