शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या सन्मानासाठी तालुकास्तरावरून प्रस्ताव मागविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 13:39 IST

वाशिम : शिक्षकांना प्रोत्साहन देणे, आदर्शवत कार्य करणाºया शिक्षकांच्या पाठिवर कौतुकाची थाप म्हणून यावर्षी प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देएकूण १२ आदर्श शिक्षकांना शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातून आदर्श शिक्षक सन्मानासाठी प्रस्ताव मागविण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शिक्षकांना प्रोत्साहन देणे, आदर्शवत कार्य करणाºया शिक्षकांच्या पाठिवर कौतुकाची थाप म्हणून यावर्षी प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्रत्येकी तालुक्यातून दोन याप्रमाणे एकूण १२ आदर्श शिक्षकांना शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने गौरविण्यात येणार आहे.  ‘गुरू’ या शब्दात प्रचंड सामर्थ्य, प्रेरणास्त्रोत, आदर, कृतज्ञता दडली आहे. विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांचे मोलाचे योगदान असते. विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करणारे, शाळेत नवोपक्रम राबविणारे, नवनवीन संकल्पना राबवून शैक्षणिक वातावरण प्रफुल्लित करणारे, हसतखेळत अध्ययन-अध्यापन, मोफत शिकवणी देणारे आदी विविध उपक्रम राबवून समाजात खºया अर्थाने आदर्शवत ठरणाºया शिक्षकांचा शिक्षकदिनी यथोचित सन्मान व्हावा, आदर्श शिक्षकांपासून इतरांनी प्रेरणा घ्यावी, आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून आदर्श शिक्षकांचा शिक्षकदिनी सत्कार केला जातो. जिल्हा परिषद स्तरावरही आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्याच्या स्पष्ट सूचना शासनाने दिलेल्या आहेत. तथापि गत दोन, तीन वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशासनातर्फे शिक्षकदिनी आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्याचे सोयीस्कररित्या टाळण्यात आले होते. या प्रकाराबद्दल शिक्षकांमधून नाराजीचा सूरही उमटला होता. गत दोन, तीन वर्षाची पुनरावृत्ती टाळून आदर्शवत कार्य करणाºया शिक्षकांचा शिक्षकदिनी सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी पुढाकार घेतला असून, प्रत्येक तालुक्यातून आदर्श शिक्षक सन्मानासाठी प्रस्ताव मागविण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. प्रत्येक तालुक्यातून दोन शिक्षक याप्रमाणे सहा तालुक्यातून एकूण १२ आदर्श शिक्षकांना ५ सप्टेंबर रोजी सन्मानित केले जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षकWashim ZPवाशीम जिल्हा परिषद