शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

८० ग्राम पंचायत इमारतीचा प्रस्ताव अडकला त्रूटीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 18:28 IST

त्रूटींची पुर्तता करताना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाची दमछाक होणार आहे. 

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ८० ग्राम पंचायत इमारतीसाठी जिल्हा परिषदेने पाठविलेल्या १२ कोटी रुपयांच्या प्रस्तावात जिल्हा नियोजन समितीने त्रूट्या काढल्या आहेत. नियोजन समितीने यापूर्वी कधीही न काढलेल्या या त्रूटींची पुर्तता करताना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाची दमछाक होणार आहे. जिल्ह्यात ४९१ ग्राम पंचायती असून, यापैकी ९७ ग्राम पंचायतींना स्वतंत्र इमारत नाही. त्यामुळे भाडेतत्वावरील तसेच पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नसलेल्या इमारतीत ग्रामपंचायत कार्यालये थाटण्यात आली आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होते.  याची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक दीपक कुमार मीना यांनी सन २०१९-२० या वर्षात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत जनसुविधा विकास योजनेंतर्गत स्वतंत्र इमारत नसलेल्या ८० ग्राम पंचायत इमारतीकरीता १२ कोटी निधी मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे १ आॅगस्टदरम्यान पाठविला होता. या मागणी प्रस्तावात जिल्हा नियोजन समितीने प्रामुख्याने चार प्रकारच्या त्रूट्या काढल्या आहेत. जनसुविधा विकास योजनेंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात प्राप्त झालेल्या निधीचे प्रशासकीय मान्यता आदेश, कार्यारंभ आदेश व उपयोगिता प्रमाणपत्र तसेच जनसुविधा विकास योजनेंतर्गत स्पील निधी असल्यास स्पिलच्या कामांचा निधी मागणी प्रस्ताव प्रथम सादर करण्यात यावा, ग्राम पंचायत इमारत बांधकामाचे सक्षम प्राधिकाºयांचे तांत्रिक मंजूरीप्राप्त अंदाजपत्रक, ग्राम पंचायत इमारत बांधकामाचे जागा उपलब्धता प्रमाणपत्र, इमारत देखभाल दुरूस्तीबाबतचे प्रमाणपत्र आदी त्रूटींची पुर्तता करून परत प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषद प्रशासनाला सूचविले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत जनसुविधा विकास योजनेंतर्गत पाठविलेल्या कोणत्याही प्रस्तावात अशा प्रकारच्या त्रूट्या काढल्या नाहीत. त्यामुळे शासकीय कार्यालय इमारत बांधकामाच्या प्रस्तावातच अशा त्रूट्या का काढण्यात आल्या? यावर जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्राम पंचायत वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे. त्यामुळे ग्राम पंचायत इमारत बांधकामासाठी निधी मिळणार की नाही यासंदर्भात साशंकता वर्तविली जात आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत