शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील निर्वासितांच्या मालमत्ता होणार निर्बंधमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 14:14 IST

या सर्व मालमत्तांचा धारणाधिकार अ-१ धारणा प्रकार अथवा भोगवटादार वर्ग-१ करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासित नागरिकांच्या वसाहती वाशिमकारंजा लाड येथे उभारण्यात आल्या होत्या. या निर्वासितांना निवासी व वाणिज्य प्रयोजनार्थ देण्यात आलेल्या मालमत्ता निर्बंधमुक्त  होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींनी भारतात सोडलेली मालमत्ता आणि राज्य व केंद्र शासनाने त्यात घातलेली भर यातून मालमत्तांचा भरपाई संकोष तयार करण्यात आला. या भरपाई संकोषामधून १९५४ च्या निर्वासित इसम नुकसान भरपाई व पुनर्वसन अधिनियमाच्या आधारे निर्वासितांना मालकी हक्काने मालमत्ता वितरीत करण्यात आल्या. कोणत्याही अटी, शर्ती अथवा करारनाम्याशिवाय निवासी व वाणिज्य प्रयोजनार्थ या मालमत्ता वितरीत करण्यात आल्या असल्याने या सर्व मालमत्तांचा धारणाधिकार अ-१ धारणा प्रकार अथवा भोगवटादार वर्ग-१ करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मालमत्तांचा धारणाधिकार अ-१ धारणा प्रकार अथवा भोगवटादार वर्ग-१ केल्यामुळे या मालमत्ता हस्तांतरणावरील निर्बंधातून मुक्त होणार आहेत. भरपाई संकोषातून अशा मालमत्ता मिळालेल्या व्यक्तींनी संबंधित उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्याकडे सर्व कागदपत्रांसह १६ आॅगस्ट २०१९ पूर्वी उपस्थित राहावे. या कार्यवाहीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. नियमानुसार कागदपत्रे प्राप्त झाल्यास २५ आॅगस्ट २०१९ पर्यंत विशेष मोहीम राबवून सर्व प्रकारणे निकाली काढण्यात येतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा