शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

  कोविड-१९ लसीकरणाचे योग्य नियोजन करा - जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 12:41 IST

Washim News योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

वाशिम : कोविड-१९ या महामारीला जिल्ह्यात प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लस उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरणासाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात कोविड-१९ लसीकरणाच्या अंमलबजावणीबाबत गठीत जिल्हा कृती दल समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, अपर जिल्हाधिकारी शरद पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आर. डी. तांगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ए. डी. मानकर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक सम्यक मेश्राम, युनिसेफचे डॉ. शैलेश पाटील, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी पोलीस निरीक्षक एस. जी. घुगे, महिला व बाल विकास विभागाचे प्रतिनिधी व्ही. बी. शिंदे, आयएमएचे सचिव डॉ. अमित गंडागुळे, स्काऊटचे गावंडे, संतोष इंगळे, सरिता चव्हाण,  लिहितकर यांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले की, पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स त्यानंतर ५० वर्षांवरील व अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती यांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांची माहिती तातडीने संकलित करावी. कोविड-१९ च्या नियमित लसीकरणासाठी किती कर्मचारी वर्ग लागणार आहे, हे निश्चित करावे, असे सांगून ते म्हणाले, सर्व तहसिलदारांना देखील याबाबतची माहिती द्यावी. लसीकरण केल्यानंतर उरलेल्या जैव वैद्यकीय कचºयाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरण करताना विशेष काळजी घ्यावी. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेवून उर्वरित टप्प्यांचे योग्य नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.डॉ. आहेर यांनी जिल्ह्यातील कोविड-१९ लसीकरणाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीची तसेच उपाययोजनांची माहिती यावेळी दिली. जिल्ह्यातील लसीकरणासाठी ९४९ व्हॅक्सिन कॅरिअर निश्चित करण्यात आल्याचे सांगितले. संगणक सादरीकरणातून कोविड-१९ लसीकरणाबाबतची माहिती डॉ. शैलेश पाटील यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या