शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला पदोन्नती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 11:48 IST

Washim ZP News : काही विशिष्ट अटींवर ही पदोन्नती दिल्याची विश्वसनीय माहिती असून, याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात एका कर्मचाऱ्याला विभागांतर्गतची (डिपार्टमेंटल) परीक्षा उत्तीर्ण न करतानाच पदोन्नती दिल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. काही विशिष्ट अटींवर ही पदोन्नती दिल्याची विश्वसनीय माहिती असून, याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.शासकीय सेवेचा विशिष्ट कालावधी पूर्ण करणे आणि जिल्हा सेवा प्रवेशोत्तर (डिपार्टमेंटल) परीक्षा चार वर्षात तीन संधींमध्ये उत्तीर्ण करणाऱ्या जि.प. कर्मचाऱ्याला पदोन्नतीचा लाभ दिला जातो. शक्यतोवर सप्टेंबर महिन्यात पदोन्नती करण्यात यावी, असे नियमानुसार अपेक्षित आहे.  मार्च २०२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील काही कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला. तत्पूर्वी बांधकाम विभाग, पदोन्नती समिती, सामान्य प्रशासन विभाग आदी विभागातून पदोन्नतीच्या या फाइलचा यशस्वी प्रवास झाला. सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर, बांधकाम विभागाचे तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता सुरेश औतकर यांच्या कार्यकाळात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या या पदोन्नती प्रक्रियेतील काही किस्से आता समोर येत आहेत. काही अटी, शर्तीवर एका कर्मचाऱ्याला विभागांतर्गतची परीक्षा उत्तीर्ण न करताच पदोन्नती दिल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे.  मात्र, याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात असल्याने कुठेतरी पाणी तर मुरत नाही ना, अशी चर्चाही रंगत आहे. दरम्यान, शक्यतोवर सप्टेंबर महिन्यात पदोन्नतीचे प्रकरण निकाली काढणे अपेक्षित असते. मार्च २०२१ या महिन्यात जिल्हा परिषदेचे अन्य विभागवगळता बांधकाम विभागात पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली. तत्कालीन कार्यकारी अभियंता औतकर              यांनी ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होण्यापूर्वी पदोन्नतीची फाइल निकाली काढली, हे विशेष.

 

माझ्याकडे जलसंधारण विभागाचा प्रभार असून बांधकाम विभागातील पदोन्नती प्रक्रियेविषयी मला काही माहिती नाही. मी बांधकाम विभागाचा प्रभार घेण्यापूर्वीचे पदोन्नतीचे हे प्रकरण आहे. तरी याबाबत सविस्तर माहिती घेतली जाईल. - ए.एम. खानप्रभारी कार्यकारी अभियंता, बांधकाम विभागजिल्हा परिषद वाशिम.

पदोन्नती समितीत पाच जणांचा समावेश असतो. पदोन्नतीबाबतचा निर्णय हा पदोन्नती समितीतील सदस्य घेत असतात. सर्व बाबींची पडताळणी केल्यानंतर पदोन्नती दिली जाते. बांधकाम विभागातील पदोन्नतीबाबत सविस्तर माहिती घेतल्यानंतर नेमके काय प्रकरण आहे, ते सांगता येईल.- विवेक बोंद्रे,उपमुख्य कार्यकारी अधिकारीसामान्य प्रशासन, जि. प. वाशिम.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रियेविषयी संबंधितांकडून माहिती घेतली जाईल. चौकशीअंती चुकीच्या पद्धतीने पदोन्नती झाल्याचे निदर्शनात आले तर याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही शासन नियमानुसार करण्यात येईल.- वसुमना पंतमुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद वाशिम.

टॅग्स :Washim ZPवाशीम जिल्हा परिषदwashimवाशिम