शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By नंदकिशोर नारे | Updated: March 28, 2023 13:45 IST

जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसिंचन प्रकल्प उभारल्या गेले व काही प्रकल्प निर्माणाधीन आहेत. 

वाशिम : प्रकल्पग्रस्तांना न्याय हक्कासाठी बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्यावतीने २८ मार्च रोजी महामोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात हजारो शेतकऱ्यांसह महिला सहभागी झाल्या होत्या. शेतकरी नेते माणिकराव गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते. जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसिंचन प्रकल्प उभारल्या गेले व काही प्रकल्प निर्माणाधीन आहेत. 

सन २००६ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत प्रकल्पांकरीता ज्या शेतकऱ्यांनी जगण्याचे एकमेव साधन असलेली जमीन दिली. त्यांना अद्यापही योग्य तो मोबदला मिळाला नाही, तसेच सरळ खरेदी पद्धतीने ३९ हजार रुपये प्रति एकर ते २ लाख रुपये प्रति एकर या प्रमाणे अत्यल्प दराने सरळ खरेदी पद्धतीने जमिनी संपादित केल्या. देण्यास विरोध करणाऱ्या शेतकरी यांना जास्त दराने २० लक्ष रुपये एकराने मोबदला देण्यात आला. 

विशेष म्हणजे ज्या भू-धारकांनी शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देवून जमीनी दिल्या त्यांच्यावर सरळ खरेदी पद्धतीने अत्यल्प दराने जमीनी खरेदी करून प्रकल्प ग्रस्तांचे आतोनात नुकसान झाले. त्यामुळे सरळ खरेदी धारकरांमध्ये प्रचंड असंतोष असल्या कारणाने न्याय मिळण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा महामोर्चा काढण्यात आला होता.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्टैंड ते जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.

प्रकल्पग्रस्तांच्या लक्षवेधी मागण्यासन २००६ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत सरळ खरेदीधारक शेतक-यांना सन २०१३ च्या कायदयानुसार वाढीव मोबदला देणे. प्रकल्पग्रस्तांचे ५ टक्यांचे समांतर आरक्षणामध्ये वृध्दी करुन १५ टक्के करण्यात यावे तसेच महाराष्ट्र पुर्नवसन कायद्याप्रमाणे विस्थापीत कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय, निमशासकीय सेवेत समावुन घेणे, तसेच शासकीय सेवेत सामावुन घेणे शक्य नसल्यास प्रकल्पग्रस्तास एकरकमी २० लक्ष रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे. 

टॅग्स :washimवाशिम