शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प उरला नावापुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:32 IST

शहरातील विविध भागात कंपोस्ट टाक्या (पिट) लावण्यातही आले होते, परंतु सद्यस्थितीत या टाक्यांची तूटफूट झाली असल्याचे दिसून येत आहे.

- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील बगिच्यांना, नगर परिषद कार्यक्षेत्रातील झाडांना देण्यासाठी नगरपालिका शहरातून गोळा करीत असलेल्या कचºयातून स्वत: कंपोस्ट खत तयार करण्याचा प्रकल्प वाशिम नगरपरिषदेच्यावतिने हाती घेण्यात आला होता. शहरातील विविध भागात कंपोस्ट टाक्या (पिट) लावण्यातही आले होते, परंतु सद्यस्थितीत या टाक्यांची तूटफूट झाली असल्याचे दिसून येत आहे.वाशिम नगरपरिषदेच्यावतिने शहरातील विविध भागात लावलेले कंपोस्ट टाक्या (पिट) यामधून दरमहा ६ ते ७ टन खताची निर्मिती होणार होती. सदर खत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णयही नगर परिषदेने घेतला होता,परंतु प्रभावी अंमलबजावणीअभावी असे काहीच होवू शकले नाही.वाशिम शहरात दररोज सकाळी व संध्याकाळी घंटागाडयांव्दारे ओला व सुक्या कचºयाचे संकलन केल्या जाते. ओल्या कचºयापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा निर्णय नगरपरिषद प्रशासनाने घेतला होता व प्रत्यक्षात कामास सुरुवात ही करण्यात आली. होती. यासाठी शहरातील काही भागात ३ बाय १२ आकाराचे १० कंपोस्ट खत आर्टिफिशियल कंपोस्ट पिट (टाक्या) तयार करण्यात आल्या होत्या. यामध्ये कंपोस्ट खत तयार करण्यास सुरुवात ही करण्यात आली होती. काही दिवसच ते व्यवस्थित झाले त्यानंतर याकडे कुणीही लक्ष दिले नसल्याने हा प्रकल्प नावापुरताच राहिला.सद्य: स्थितीत नगर पालिकेतर्फे तयार करण्यात आलेले आर्टिफिशीयल कंपोस्ट पिटाची तूटफूट झाली असून त्याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही. शहरातील डंम्पींग गार्डनवर कायमस्वरुपी पीट तयार करण्याच्या कामास सुरुवात करुन कंपोस्ट खत तयार होणार होते; परंतु शहरातील विविध भागात तयार करण्यात आलेले पिट आज दिसेनासे झाले आहेत तर जे आहेत, त्याची तूटफूट झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या देखरेखीखाली हे कंपोस्ट खत नियोजनबध्द तयार करण्यात येणार होते; मात्र मध्यंतरी वाशिम नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांची बदली झाल्यानंतर कायमस्वरूपी मुख्याधिकारी न मिळणे यासह अन्य स्वरूपातील अडचणींमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.

शेतकºयांना खत मिळालेच नाहीवाशिम शहरातील ओल्या कचºयापासून निर्माण होणाºया खताचे प्रमाण जास्त असल्याने सदर खत ज्या शेतकºयांना लागेल त्यांना अल्पदरात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला होता परंतु नियोजनाअभावी ते कोणालाही मिळू शकले नाही. मोठा गाजावाजा करत नगरपरिषद प्रशासनाने या प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शेटे यांची बदली होईपर्यंत तो व्यवस्थितरित्या चालला त्यानंतर मात्र याकडे कुणीही फिरकून पाहिले नाही.

एका चांगल्या उद्देशाने कंपोस्ट खत निर्मितीकरिता वाशिम शहरात विविध ठिकाणी कंपोस्ट टाक्या (पिट) लावण्यात आल्या आहेत. मध्यंतरी काही तांत्रीक अडचणींमुळे या कामास निश्चितपणे ‘ब्रेक’ लागला. असे असले तरी लवकरच हा उपक्रम पुन्हा एकवेळ पूर्ण ताकदीने राबविण्यात येईल.- अशोक हेडानगराध्यक्ष, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिम