शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
3
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
4
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
5
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
6
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
7
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
8
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
9
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
10
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
11
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
12
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

गोकसावंगी परिसरातील प्रकल्पग्रस्तांचे दुसऱ्या दिवशीही उपोषण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:46 PM

वाशिम:  प्रकल्पग्रस्तांना मेडशी येथील भावना मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था व गोकसांवगी येथील गणेश मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेमध्ये भागधारक सभासद करून घेण्याच्या मागणीसाठी १३ नोव्हेंबरपासून  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेले उपोषण १४ नोव्हेंबर रोजीदेखील सुरूच आहे. 

ठळक मुद्देमत्स्यसंस्थेत सभासद करून घेण्याची मागणी पहिल्या दिवशी तोडगा नाही

वाशिम:  प्रकल्पग्रस्तांना मेडशी येथील भावना मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था व गोकसांवगी येथील गणेश मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेमध्ये भागधारक सभासद करून घेण्याच्या मागणीसाठी १३ नोव्हेंबरपासून  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेले उपोषण १४ नोव्हेंबर रोजीदेखील सुरूच आहे. सहायक निबंधक मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था कार्यालय, अकोला यांना दिलेल्या निवेदनानुसार, मेडशी येथे उर्ध्व मोर्णा प्रकल्पावर भावना व श्री गणेश मत्स्य व्यवसाय संस्था कार्यरत आहे. या संस्थेमध्ये प्रकल्पग्रस्ताव्यतिरिक्त  इतर अध्यक्ष व सभासद व संचालक मंडळात यांचा समावेश आहे. मात्र  या दोन्ही संस्थेमध्ये एकाही प्रकल्पग्रस्ताला सभासद म्हणून समावून घेण्यात आले नाही.  यासाठी वेळोवेळी मत्स्य व्यवसाय संस्था कार्यालय, अकोला यांच्याकडे निवेदने दिली. मात्र अधिकाºयांनी या निवेदनाला केराची टोपली दाखविली. १२ नोव्हेंबरपर्यंत प्रकल्पग्रस्तांना सभासद करून घेतले नाही, तर १३ नोव्हेंबरपासून  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटूंबासह बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा  दिला होता. १२ नोव्हेंबरपर्यंत न्याय न मिळाल्याने १३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले. पहिल्या दिवशी कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे १४ नोव्हेंबर रोजीदेखील उपोषण सुरू आहे. प्रशासनातर्फे जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला. महादेव लक्ष्मण चतरकर, संतोष शिताराम तायडे, प्रकाश बळीराम तायडे, अविनाश वानखेडे, महादेव तायडे, जावेद भवानीवाले, लक्ष्मण वानखेडे, दसरत तायडे, प्रदिप जाधव, संजय राठोड, अनिल तायडे, राजु तायडे, गजानन वानखेडे, संतोष वानखेडे, सुनिल तायडे, सुरेश वानखेडे, बालु वानखेडे यांच्यासह अनेकजण उपोषणाला बसले आहेत.

टॅग्स :agitationआंदोलन