शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणविरोधी धोरणांविरूद्ध प्राध्यापकांचा ‘एल्गार’; बेमुदत कामबंद आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 14:26 IST

वाशिम जिल्ह्यातीलही प्राध्यापकांनी सहभाग नोंदवून विविध महाविद्यालयांसमोर आंदोलनास सुरूवात केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यसरकारच्या शिक्षणविरोधी धोरणाचा निषेध नोंदवत महाराष्ट्रातील प्राध्यापक संघटनांनी २५ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातीलही प्राध्यापकांनी सहभाग नोंदवून विविध महाविद्यालयांसमोर आंदोलनास सुरूवात केली आहे. विविध स्वरूपातील प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांनी २ जुलै २०१८ पासून आंदोलन पुकारले असून यादिवशी सरकारला पुढील आंदोलनाची सूचना देखील देण्यात आली होती. त्यानुसार, ६ आॅगस्ट २०१८ ला आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून महाविद्यालयांमध्ये काळ्याफिती लावून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. २० आॅगस्ट २०१८ ला सहसंचालकांच्या कार्यालयावर धरणे आंदोलन झाले. त्यानंतर २७ आॅगस्ट २०१८ ला पुणे येथील उच्चशिक्षण विभाग कार्यालयावर धरणे आंदोलन आणि त्यानंतर ४ सप्टेंबर २०१८ रोजी मुंबई येथे जेलभरो आंदोलन पार पडले. ११ सप्टेंबर २०१८ ला प्राध्यापकांनी एकदिवशीय सामूहिक रजा  आंदोलन पुकारले. मात्र, त्याऊपरही मागण्या निकाली निघाल्या नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव व ठरल्यानुसार २५ सप्टेंबर २०१८ पासून बेमुदत कामबंद आंदोलात सहभागी झालो आहोत, असे आंदोलक प्राध्यापकांनी सांगितले.प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांमध्ये सन २०१४ पासून महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीवरील बंदी उठविणे, २००५ नंतर सेवेत असलेल्या प्राध्यापकांना जुनीच  पेन्शन योजना लागू करावी, २०१३ मध्ये परिक्षेच्या कामावरील बंदीमध्येही काम केले, त्या ७१ दिवसांचा पगार देण्यात यावा, कंत्राटी शिक्षकांचे मानधन वाढविण्यात यावे, सातवा वेतन आयोग लवकरात लवकर लागू व्हावा, आदी मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनाला वाशिम जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक