शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात नाफेड’च्या सोयाबिन खरेदीची प्रक्रिया मंदावली : अडीच महिन्यात केवळ चार हजार क्विंटल खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 15:59 IST

वाशिम: जिल्ह्यात ५ आॅक्टोबर २०१७ पासून सोयाबिन, मूग, उडिद या शेतमालाची ‘नाफेड’मार्फत आॅनलाईन नोंदणी करून खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, हमीदरानुसार सुरू असलेल्या या खरेदीला शेतकºयांकडून विशेष प्रतिसाद मिळेनासा झाला आहे.

ठळक मुद्दे गेल्या अडीच महिन्याच्या कालावधीत ‘नाफेड’च्या जिल्ह्यातील सहा केंद्रांवर केवळ ४ हजार २४० क्विंटल सोयाबिनची खरेदी झाली आहे. शेतकºयांचा कल आजही व्यापाºयांकडेच अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. 

वाशिम: जिल्ह्यात ५ आॅक्टोबर २०१७ पासून सोयाबिन, मूग, उडिद या शेतमालाची ‘नाफेड’मार्फत आॅनलाईन नोंदणी करून खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, हमीदरानुसार सुरू असलेल्या या खरेदीला शेतकºयांकडून विशेष प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. त्यामुळेच गेल्या अडीच महिन्याच्या कालावधीत ‘नाफेड’च्या जिल्ह्यातील सहा केंद्रांवर केवळ ४ हजार २४० क्विंटल सोयाबिनची खरेदी झाली आहे. जेव्हा की, एकट्या वाशिम बाजार समितीत एवढ्या सोयाबिनची दैनंदिन खरेदी होते. यावरून शेतकºयांचा कल आजही व्यापाºयांकडेच अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. ५ आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, रिसोड, कारंजा, मालेगाव आणि मानोरा या सहा ठिकाणी ‘नाफेड’ने खरेदी केंद्र सुरू करून सोयाबिन, मूग आणि उडिद या शेतमालाची खरेदी सुरू केली. प्रत्यक्षात मात्र सोयाबिन आणि मूग उत्पादक शेतकºयांनी या खरेदी केंद्रांकडे सपशेल पाठ फिरवली असून अडीच महिन्यात ४ हजार २४० क्विंटल सोयाबिन आणि ९३८ क्विंटल मूग खरेदी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली.उडिदाची विक्रमी खरेदी!वाशिम जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या सहा खरेदी केंद्रांकडे सोयाबिन आणि मूग उत्पादक शेतकºयांनी पाठ फिरवली असली तरी उडिद उत्पादक शेतकºयांनी मात्र व्यापाºयांऐवजी आपला माल ‘नाफेड’कडे विकणे पसंत केले आहे. त्यामुळेच गेल्या अडीच महिन्यात सहा केंद्रांवर उडिद खरेदीने ४४ हजार ६३८ क्विंटलचा मोठा पल्ला गाठला आहे. 

कापूस खरेदी अद्याप निरंकच!सोयाबिन, मूग आणि उडिद या शेतमालाच्या खरेदी केंद्रानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या केंद्रांवर कापसाची खरेदीही सुरू करण्यात आली आहे. मात्र, या केंद्रांकडे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांनी दुर्लक्ष केले असून खरेदी केंद्र सुरू झाले तेव्हापासून आजतागायत एक बोंड देखील कापूस खरेदी झालेला नाही. 

टॅग्स :washimवाशिम