शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

पोषण आहार विक्री प्रकरणी कारवाई गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 18:15 IST

गटशिक्षणाधिकाºयांनी चौकशीही केली; परंतु आता १८ दिवस उलटले तरी या प्रकरणी कारवाई गुलदस्त्यातच आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कमोहरी (वाशिम) : मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी येथील जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहाराचे धान्य मुख्याध्यापक आणि शाळा समिती उपाध्यक्षांनी संगनमत करून विकले, अशी तक्रार मोहरी येथील पालकवर्ग व गावकºयांनी गटशिक्षणाधिकारी मंगरुळपीर, जि.प. शिक्षणाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे २१ आॅगस्ट रोजी केली होती. या प्रकरणी गटशिक्षणाधिकाºयांनी चौकशीही केली; परंतु आता १८ दिवस उलटले तरी या प्रकरणी कारवाई गुलदस्त्यातच आहे.  मोहरी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथ्या वर्गापर्यंतची शाळा असून, या शाळेत ६२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत मुख्याध्यापकासह दोन शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेत पोषण आहारासाठी मिळालेला तांदुळ व कडधान्य मुख्याध्यापकांनी विकले, अशी तक्रार गावकºयांनी गटशिक्षणाधिकारी मंगरुळपीर, जि.प. शिक्षणाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती.  शाळेचे मुख्याध्यापक व शाळा समिती उपाध्यक्ष नरेंद्र भोपत मिसाळ यांनी संगनमत करुण शालेय पोषण आहाराचे तांदूळ आणि कडधान्य मिळून अंदाजे सात हजार रुपये किमतीचे धान्य नरेंद्र भोपत मिसाळ उपाध्यक्ष यांच्या मालकीच्या आॅटोरिक्षात नेऊन मंगरुळपीर येथे विकल्याचे या तक्रारीत त्यांनी नमूद केले होते. या संदर्भात लोकमतने २२ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करून शिक्षण विभागाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन मंगरुळपीर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी करून जिल्हास्तरावर अहवाल पाठविला आहे; परंतु आता १८ दिवस उलटले तरी, या प्रकरणी कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाचा केवळ चौकशीचा फार्स तर नव्हता ना, अशी शंका निर्माण होत आहे. 

मोहरी येथील पोषण आहाराचे धान्य विकल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यात शाळेत पुरवठा करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या धान्यात तफावत आढळून आली. या संदर्भातील अहवाल जिल्हास्तरावर पाठविण्यात आला आहे.- श्रीकांत मानेशिक्षण विस्तार अधिकारीपं.स. मंगरुळपीर

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर