शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सात कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत आढळल्या त्रूटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 16:37 IST

वाशिम : कृषी विभागातर्फे कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेतली जात असून, ५ ते ७ जुलैदरम्यान वाशिम शहरातील एकूण सात कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत काही त्रूटी आढळून आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभागातर्फे कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेतली जात असून, ५ ते ७ जुलैदरम्यान वाशिम शहरातील एकूण सात कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत काही त्रूटी आढळून आल्या. दोन कृषी सेवा केंद्रातील सात लाख रुपये किंमतीचे तणनाशक व किटकनाशक तसेच पाच कृषी सेवा केंद्रातील सोयाबीन बियाण्याच्या १६३ बॅग विक्री बंदचे आदेश कृषी विभागाने दिले. खरिप हंगामात शेतकºयांची फसवणूक होणार नाही याची दक्षता कृषी सेवा केंद्रांनी घ्यावी तसेच अवैध मार्गाने खते व बियाणे विक्री करू नये अशा सूचना कृषी विभागाने दिलेल्या आहेत. काही कृषी सेवा केंद्र याची दक्षता घेत आहेत तर काही कृषी सेवा केंद्रांमध्ये नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त होत आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार यांनी आढावा घेत तपासणी क रण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने ३ जुलैपासून जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय भरारी पथकातर्फे तपासणी केली जात आहे. वाशिम पंचायत समिती कृषी विभागाकडून ५ ते ७ जुलै दरम्यान तपासणी केली असता, काही कृषी सेवा केंद्राच्या नोंदवहीत त्रूटी आढळून आल्या.  नियमांचे उल्लंघन करणाºया दोन कृषी सेवा केंद्रातील सात लाख ६१ हजार २१४ रुपये किंमतीचे ६०१ लिटर तणनाशक व कीटकनाशक विक्रीस बंदी घालण्यात आली आहे तसेच त्यांना सात दिवसात त्रुटींची पूर्तता व खुलासा सादर करणेसाठी नोटिस बजावण्यात आली. विक्री परवानामध्ये समविष्ट नसलेली उत्पादने खरेदी-विक्री करीत असल्याने सदर विक्री बंद आदेश देण्यात आले. तसेच साठा फलक व साठा पुस्तक अद्यावत न ठवणे, मुक्तता अहवाल आढळून न आलेल्या पाच  कृषी सेवा केंद्रातील दोन लाख ९ हजार ७०० रुपये किंमतीच्या सोयाबीन बियाण्याच्या १६३ बॅगवर तसेच तूरीच्या ९ बॅगवरसुद्धा विक्री बंद आदेश देण्यात आले. खबरदारी म्हणून बियाण्यांचे २१ नमुने व खतांचे पाच नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, तपासणी अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. 

 टोल फ्री क्रमांकावर करता येईल तक्रार !शेतकºयांनी कृषी निविष्ठांची खरेदी ही अधिकृत विक्रेत्यांकडूनच करावी, पक्के बिल घ्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले. खते, बियाणे, किटकनाशक आदीसंदर्भात काही तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाचा १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावरही शेतकºयांना तक्रार नोंदविता येणार आहे. कृषि सेवा केंद्रधारकांनी आपल्या परवान्यात समाविष्ठ असलेल्या उत्पादनांचीच खरेदी-विक्री करावी. ज्या उत्पादनांची खरेदी-विक्री करावयाची आहेत ती आपल्या परवान्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी प्रक्रिया करावी व परवाना अधिकारी यांची मान्यता असल्यास विक्री करावी, अशा सूचना पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रण निरीक्षक रमेश भद्रोड यांनी केल्या.

टॅग्स :washimवाशिम