शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी खासगी शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 13:53 IST

वाशिम : शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणामुळे संतप्त झालेल्या खासगी शिक्षण संस्था चालकांनी २ नोव्हेंबरला पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला वाशिम जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद लाभला, असा दावा शिक्षण संस्था चालक संघटनेने केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणामुळे संतप्त झालेल्या खासगी शिक्षण संस्था चालकांनी २ नोव्हेंबरला पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला वाशिम जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद लाभला, असा दावा शिक्षण संस्था चालक संघटनेने केला. शासनमान्य अनुदानित शाळांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे. एकिकडे अनुदानित शाळांना अडचणीचे ठरणारे निर्णय घ्यायचे आणि दुसरीकडे ‘मागेल त्याला शाळा’ हे धोरण चालूच ठेवायचे, या कुटनितीमुळे खासगी अनुदानित शाळा संचालक अडचणीत सापडले असून, याविरोधात आवाज उठविण्याबरोबरच विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २ नोव्हेंबरला खासगी शाळांनी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. या बंदमध्ये वाशिम जिल्ह्यातील १०० टक्के शाळा सहभागी झाल्याचा दावा शिक्षण संस्था संघटनेचे विभागीय अध्यक्ष अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांनी केला.व्यावसायीक खासगी कंपनीला शाळा देण्याचे विधेयक मागे घ्यावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया पुर्ववत करावी, सन २००५ नंतर नियुक्त कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करावी, शिक्षण सेवक योजना बंद करण्यात यावी, पवित्र पोर्टल ही संगणकीय प्रणाली बंद करून शिक्षण संस्थेचा शिक्षक भरती विषयक अधिकार कायम ठेवावा, वेतनेत्तर अनुदान पुर्वीप्रमाणेच १२ टक्के देण्यात यावे, वाडी-वस्ती व दुर्गम भागातील अनुदानित शाळा बंद करण्याचा शासन निर्णय मागे घ्यावा, कर्मचारी भरती बंद असताना महाराष्ट्रात मागासवर्गीय अनुशेष भरण्याच्या परिपत्रकानुसार भरण्यात आलेली चार हजार पदे नियमित करावी यासह अन्य प्रलंबित मागण्या निकाली काढण्याची मागणी शिक्षण संस्था संघटनेने केली आहे.दरम्यान, २ नोव्हेंबर रोजी प्रथम सत्र परीक्षेचा असलेला पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. हा पेपर आता ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा