शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन’ :  लाभार्थी माहिती संकलनाचा आज शेवटचा दिवस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 15:05 IST

वाशिम : प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशनअंतर्गत ३० एप्रिल रोजीच्या ग्रामसभेस अनुपस्थित राहिलेल्या कुटुंबाची माहिती संकलीत करण्याची मुदत १० मे असून, पात्र लाभार्थींनी विहित मुदतीत माहिती देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. 

ठळक मुद्देकोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यांची काही अतिरिक्त माहिती जमा केली जात आहे. ३० एप्रिल रोजी ग्रामसभेमध्ये याद्यांचे वाचन करुन अतिरिक्त माहिती संकलन केली होती. अनुपस्थित राहिलेल्या कुटंूबाची माहिती आशा, आरोग्य सेविकेव्दारे गृहभेटी देवून १ मे ते १० मे २०१८ या कालावधीत संकलित केली जात आहे.

वाशिम : प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशनअंतर्गत ३० एप्रिल रोजीच्या ग्रामसभेस अनुपस्थित राहिलेल्या कुटुंबाची माहिती संकलीत करण्याची मुदत १० मे असून, पात्र लाभार्थींनी विहित मुदतीत माहिती देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. 

केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन’ योजने अंतर्गत पात्र लाभार्थी कुटूंबाला प्रतिवर्षी ५ लाख रुपये आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. देशभरात कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात विनामूल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे.  या योजनेअंतर्गत ग्रामीण लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलन मोहिम २१ मे २०१८ पर्यंत राबविली जात आहे.

कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये म्हणून वाशिम  जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यांची काही अतिरिक्त माहिती जमा केली जात आहे. ग्राम स्वराज्य अभियानादरम्यान लाभार्थी पडताळणी, अतिरिक्त माहिती संकलित करण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. ग्रामसेवक, एएनएम आणि आशा आदींच्या माध्यमातून २१ मे पर्यंत लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलन मोहीम राबविली जाणार आहे. लाभार्थ्याचा मोबाईल, क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक, कुटंबाच्या सद्यस्थितीमधील बदल आदी माहिती घेतली जात आहे. ३० एप्रिल रोजी ग्रामसभेमध्ये याद्यांचे वाचन करुन अतिरिक्त माहिती संकलन केली होती. या ग्रामसभेमध्ये अनुपस्थित राहिलेल्या कुटंूबाची माहिती आशा, आरोग्य सेविकेव्दारे गृहभेटी देवून १ मे ते १० मे २०१८ या कालावधीत संकलित केली जात आहे. २१ मे पर्यत लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलित केली जाणार आहे. संकलित केलेली माहिती १० मे ते २१ मे या कालावधीमध्ये संकेतस्थळावर अपलोड केली जाणार आहे. अधिकाधिक कुटूंबांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर तसेच पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना